Ticker

6/recent/ticker-posts

आधार कार्ड च्या मदतीने नविन पैन कार्ड साठी ऑनलाइन कसे अप्लाई करतात? - How To Apply Online For New Pan Card With Aadhar Card In Marathi?

आधार कार्ड च्या मदतीने नविन पॅन कार्ड साठी ऑनलाइन कसे अप्लाई करतात? - How To Apply Online For New Pan Card With Aadhar Card In Marathi?

          मित्रानो तुम्ही आजुन सुद्धा स्वता:चे पॅन कार्ड बनवले नाही तर लवकरात लवकर आपले नविन पॅन कार्ड हे बनवून घ्या. मित्रानो तुम्ही घरी बसून ऑनलाइन nsdl च्या वेबसाइट मधून किंवा इनकम टैक्स डिपार्टमेंट च्या वेबसाइट मधून नविन पॅन कार्ड ला ऑनलाइन अप्लाई करू शकतात आणि काही दिवसात तुमचे पॅन कार्ड हे एड्रेस वर पाठवले जाते.

          मित्रानो नविन पॅन कार्ड संदर्भात सर्वी माहिती या आर्टिकल मध्ये आहे. आधार कार्ड च्या मदतीने तुम्ही नविन पॅन कार्ड साठी ऑनलाइन कसे अप्लाई करू शकतात? नविन पॅन कार्ड बनविण्यासाठी ऑनलाइन किती पैसे लागतात? नविन पॅन कार्ड बनविण्यासाठी ऑनलाइन कोण-कोणते डाक्यूमेंट्स ची गरज असते? नविन पॅन कार्ड साठी AO कोड कसा शोधायचा? सर्वी प्रोसेस आणि माहिती स्टेप बाय स्टेप सर्वी माहिती या आर्टिकल मध्ये आहे तर हे आर्टिकल सम्पूर्ण वाचा.


आधार कार्ड च्या मदतीने नविन पैन कार्ड साठी ऑनलाइन कसे अप्लाई करतात? - How To Apply Online For New Pan Card With Aadhar Card In Marathi?


          मित्रानो तुमचे Abk Online Tips या ब्लॉग मध्ये आणि युट्युब चैनल मध्ये स्वागत आहे. मित्रानो तुम्हाला या ब्लॉग मध्ये आणि युट्युब चैनल मध्ये असेच ऑनलाइन सरकारी आणि डिजिटल माहिती भेटत राहतील तर आपल्या ब्लॉग ला आणि युट्युब चैनल ला सब्सक्राइब करायला विसरु नका तर चला मित्रानो आज चे हे आर्टिकल सुरु करुयात.

          मित्रानो आता तुम्ही घरी बसून आधार कार्ड च्या मदतीने नविन पॅन कार्ड साठी ऑनलाइन फार सोप्या पध्दतीने अप्लाई करू शकतात तुम्हाला कोणत्याही ठिकाणी नविन पॅन कार्ड बनविण्यासाठी जायची गरज नाही. तुम्ही nsdl च्या ऑफिसियल वेबसाइट मधून १५ मिनिटात आपले नविन पॅन साठी ऑनलाइन अप्लाई करू शकतात.

नविन पॅन कार्ड बनविण्यासाठी ऑनलाइन कोण-कोणते डाक्यूमेंट्स ची गरज असते?:-

          मित्रानो तुम्ही जेव्हा ऑनलाइन पॅन कार्ड साठी NSDL च्या वेबसाइट वर अप्लाई करतात तेव्हा त्या ठिकाणी तुम्हाला ३ आप्शन मिळतात मी त्या ३ आप्शन बद्दल सम्पूर्ण माहिती देणार आहे.

आप्शन १ - Submit digitally through e-KYC & e-sign (paperless):-

  • मित्रानो या पहिल्या आप्शन मध्ये तुम्ही तुमचे पॅन कार्ड हे आधार कार्ड चा वापर करून बनवू शकतात. या आप्शन मध्ये तुम्ही जी माहिती पॅन कार्ड मध्ये देतात ती सर्वी माहिती आधार कार्ड मध्ये असलेल्या माहिती सोबत authenticate केले जाते. 
  • तुमचे आधार सोबत authenticate पूर्ण झाल्यावर तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक असलेल्या मोबाइल नंबर वर ओटिपी पाठवला जातो या ओटिपी च्या माध्यमातून तुमचे इ-साइन केले जाते.
  • या पहिल्या नंबर च्या आप्शन मध्ये एप्लिकेंट ला कोणतेही डॉक्यूमेंट अपलोड करण्याची गरज नाही. आधार कार्ड वरील फोटो हा पैन कार्ड वर प्रिंट होऊन येतो.
  • आधार कार्ड मधील एड्रेस वर तुमचे नविन पॅन कार्ड हे पाठवले जाते.
  • मित्रानो जर तुमचे आधार कार्ड हे पूर्णपणे अपडेट असेल तर तुम्ही या पहिल्या आप्शन चा वापर करू शकतात.

आप्शन २ - Submit scanned images through e-Sign:- 

          मित्रानो या दुसर्या नंबर च्या आप्शन मध्ये तुम्हाला फोटो, तुमची साइन चा एक फोटो, आणि एड्रेस प्रूफ साठी आधार असे डॉक्यूमेंट अपलोड करावे लागतात. या आप्शन मध्ये तुम्ही आधार कार्ड चा वापर करू शकतात पण स्वता:चा फोटो आणि तुमच्या साइन चा फोटो आणि एड्रेस प्रूफ अपलोड करावे लागते.

आप्शन ३ - Forward application documents physically:- 

          मित्रानो या तिसर्या नंबर च्या आप्शन च्या मध्ये तुम्हाला ऑनलाइन नविन पॅन एप्लीकेशन फॉर्म सबमिट करावा  लागते पण या एप्लीकेशन फॉर्म ची प्रिंट काढून या फॉर्म वर तुमचे दोन फोटो लावावे लागतात, तुमची साइन करावी लागते, या सोबत आधार कार्ड आणि एड्रेस प्रूफ असे डाक्यूमेंट्स ची झेरोक्स कॉपी जोडून हे कागतपत्र तुम्हाला पॅन अथॉरिटी ऑफिस च्या एड्रेस वर पाठावयाचे असते आणि या प्रोसेस नंतर तुमचे पॅन कार्ड बनवले जाते.

          मित्रानो आता तुम्हाला या तिन्ही आप्शन बद्दल पूर्ण माहिती भेटली असेलच तुम्हाला जो आप्शन योग्य वाटेल त्या आप्शन च वापर करून तुम्ही ऑनलाइन नविन पॅन कार्ड साठी अप्लाई करू शकतात.

नविन पॅन कार्ड साठी AO कोड कसा शोधायचा?:-

          मित्रानो जेव्हा तुम्ही ऑनलाइन नविन पॅन कार्ड साठी फॉर्म भरतात तेव्हा त्या ठिकाणी तुम्हाला AO code ची स्टेप येते आणि त्या ठिकाणी तुम्ही थोड़े कन्फुज होउन जातील की कोणता AO कोड सेलेक्ट करावा? याचं उत्तर तुम्हाला खाली दिलेल्या या विडियो मध्ये आहे तुम्हाला तुमच्या घरातील मोठ्या व्यक्तीची पॅन कार्ड मधून AO कोड शोधू शकतात आणि तोच AO कोड तुम्ही तुमच्या साठी वापरू शकतात.

नविन पॅन कार्ड बनविण्यासाठी ऑनलाइन किती पैसे लागतात?:-

         मित्रानो तुम्ही भारतीय एड्रेस वर फिजिकल पॅन कार्ड मागवतात तर तुम्हाला १०७ रुपये हे ऑनलाइन पेमेंट करावे लागतात आणि तुम्ही जर दुसर्या कोणत्या देशात रहात असतील आणि तुम्हाला दुसर्या देशातील एड्रेस वर पॅन कार्ड मागवायचे असेल तर तुम्हाला १०१७ रुपये पेमेंट करावे लागेल.

          मित्रानो तुम्ही जर फ़क्त पॅन कार्ड ची पीडीऍफ़ कॉपी मागवतात तर तुम्हाला फ़क्त १०१ रुपये ऑनलाइन पे करावे लागेल या मध्ये तुम्हाला pvc टाइप कार्ड भेटणार नाही.

नविन पॅन कार्ड साठी ऑनलाइन कसे अप्लाई करू शकतात?:-

          मित्रानो नविन पॅन कार्ड तयार करण्यासाठी तुम्ही घरी बसून मोबाइल किंवा कंप्यूटर मधून ऑनलाइन अप्लाई करू शकतात. या व्यतिरिक्त तुम्ही जवळ च्या CSC सेण्टर मध्ये जाऊन आपले पॅन कार्ड बनवू शकतात. 



          मित्रानो नविन पॅन कार्ड तुम्ही ऑनलाइन घरी बसून कसे बनवू शकतात या विषयावर मी माझ्या युट्युब चैनल वर विडियो बनवलेली आहे ती विडियो एकदा नक्की पहा आणि तुमच्या मनात काही प्रश्न असेल तर कमेंट करून नक्की विचारा.