Ticker

6/recent/ticker-posts

रेशन धान्य बंद होणार १ सप्टेंबर पासून नविन नियम पहा | Ration Card Maharashtra New Update Marathi

 रेशन धान्य बंद होणार १ सप्टेंबर पासून नविन नियम पहा | Ration Card Maharashtra New Update २०२२





रेशन कार्ड अपडेट महाराष्ट्र - Ration Card Update Maharashtra:- 

          मित्रानो आता १ सप्टेंबर पासून रेशन कार्ड संदर्भातील नियमांमध्ये फार मोठा बदल करण्यात आलेला आहे आणि हे राशन कार्ड मधील बदल तुम्हा सर्वाना माहित असणे आवश्यक आहे. मित्रानो या लेख मध्ये सर्वी रेशन कार्ड नवीन उपडते बद्दल माहिती आहे तर हा लेख संपूर्ण वाचा. 

         मित्रानो सरकारने प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना जाहीर अवाहन करण्यात आलेले आहे की उच्च उत्पन्न असणाऱ्या नागरिकांनी स्वेच्छेने अन्नधान्याचा लाभ सोडवा (अन्नधान्य च्या अन्नदानातून बाहेर पडा) आणि लोकांनी रेशन कार्ड बद्दल चे नवीन नियम पाळावे व रेशन कार्ड चा वापर करावा. 

रेशन कार्ड महाराष्ट्र नविन अपडेट - -Ration Card Maharashtra New Update:- 

          मित्रानो आता तुम्ही लक्ष्यात घ्या की रेशन कार्ड तुमच्या जवळ असेल आणि तुम्ही या योजनेचा फायदा घेत असाल तर सरकारने जारी केलेले नविन नियम तुम्हाला माहिती पाहिजेल.

          मित्रानो सरकारने दिलेल्या माहिती नुसार दिनांक 31 ऑगस्ट 2022 पर्यंत स्वेच्छेने “Give it up” (धान्य सोडणे) चे अर्ज संबंधित रास्तभाव दुकानदाराकडे किंवा परिमंडळ कार्यालयाकडे तुम्हाला जमा करावे. 


रेशन धान्य बंद होणार १ सप्टेंबर पासून नविन नियम पहा  Ration Card Maharashtra New Update Marathi

          अन्यथा 01 सप्टेंबर 2022 पासून उच्च उत्पन्न असणारा (कुटुंबातील सदस्यच्या नावे चाक चाकी वाहन, एअर कंडिशनर (AC), सरकारी किंवा खाजगी नोकरी, सरकारी पेन्शन, कुटुंबातील सर्व सदस्यचे मिळून 59,000/ पेक्षा जास्त उत्पन्न असल्यास) व्यक्ती चे धान्य बंद करुन आजपर्यंत घेतलेले धान्याची वसुली बाजारभावाने करण्यात येईल व शासनाची फसवणुक केल्याबद्दल तुमच्यावर कार्यवाही सुद्धा करण्यात येईल. 

          सर्व रेशन कार्ड धारक नागरिकांना सुचित करण्यात येते की, शासनाचे सुधारीत सुचनेप्रमाणे आपणास सुचित करण्यात येते की,

  • मित्रानो रेशन कार्ड धारकांच्या कुटूंबातील कोणतीही व्यक्ती शासकीय, निमशासकीय सरकारी सेवेत असल्यास तुम्ही या योजनेत सहभागी होऊ शकत नाही.
  • तुमच्या कुटुंबामध्ये 2 चाकी, 3 चाकी, 4 चाकी किंवा टॅक्टर असल्यास.
  • सर्व मार्गांनी मिळूण कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 59,000/- पेक्षा ज्यास्त असल्यास.
  • 5 एकरापेक्षा जास्त जमीन धारक असल्यास (ओलीत, सिंचन, विहीरसह)
  • RC मधील घराचे पक्के बांधकाम असल्यास. सवलतीच्या दरात रेशन कार्डावरील धान्य उचल करत असल्यास सदर कार्ड धारकांने स्वतःहून आपल्या कार्डाची वर्गवारी बदलुन घ्यावी असे सांगन्यात आलेली आहे.
  • अन्यथा सवलतीच्या दरामध्ये आजपर्यंत घेतलेले अन्न धान्याची शासकीय दराप्रमाणे तुमच्या कडून वसुली करण्यात येईल. या बाबतची सर्व जबाबदारी कार्ड धारकांची राहील.

          मित्रानो भरपूर लोक आपल उत्पन्न लपवून हे रेशन चे धान्य विकत घेत आहे. ज्या नागरिकांचे वार्षिक उत्पन्न ज्यास्त असेल ते आता रेशन कार्ड वरून कोणतेही धान्य घेऊ शकत नाही याची तपासणी आता सरकारने सुरु केली आहे आणि या साठी तुम्हाला तुमचे रेशन कार्ड हे बंद करावे लागणार आहे.

Ration Card Maharashtra New Update Marathi


          जे रेशन कार्डधारक अन्न सुरक्षा योजने नुसार धान्याचा लाभ घेतात तरी यातील काही कार्डधारक लाभार्थी पैकी नागरिक जे शासकीय नोकर, निमशासकिय नोकर, व्यावसायीक, किराणादुकाणदार, पेन्शन धारक, ट्रॅक्टर असणारे बागायतदार शेतकरी, मोठ-मोठ्या कंपणीत काम करणारे, तसेच साखर कारखाण्यात परमनंट असणारे कामगार, आयकर भरणारे, पक्के घर (स्लॅप बिल्डींग) असणारे, चार चाकी वाहन (घरगुती व व्यावसायीक) धारक आहे यांनी 31/08/2022 पर्यंत अन्न धान्य योजनेतून बाहेर पडा कारण आता असे कामगारांना रेशन कार्ड वर धान्य मिळणार नाही या साठी सरकार ने रेशन कार्ड ला आधार कार्ड लिंक करण्याची प्रोसेस सुद्धा चालू केली.

          मित्रानो रेशन कार्ड बंद करण्यासाठी सरकारने नागरिकांना स्वइच्छेने या योजने तुन बाहेर पड़न्यासाठी एक फॉर्म दिलेला आहे आणि तो फॉर्म तुम्ही या खाली दिलेल्या डाउनलोड फॉर्म या आप्शन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.

  • रेशन कार्ड फॉर्म येथे डाउनलोड करा:- Download Form

          मित्रानो हा फॉर्म भरून तुम्हाला हा फॉर्म तुमच्या रेशन दुकानात किंवा तहसील कार्यालयात जमा करू शकतात. मित्रानो या बाबतीत तुम्हाला अधिक माहिती पाहिजेल असेल तर तुम्ही तुमच्या रेशन धान्य दूकान तपासणी करू शकतात.

          मित्रानो रेशन धान्य बंद होणार १ सप्टेंबर पासून नविन नियम पहा  Ration Card Maharashtra New Update Marathi बद्दल ची आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करूण नक्की सांगा आणि abk ऑनलाइन टिप्स ब्लॉग ला आणि youtube चैनल ला सब्सक्राइब करायला विसरु नका चला मित्रानो भेतुया एका नविन विषया सोबत पुढच्या आर्टिकल मध्ये तो पर्यन्त जय हिन्द जय महाराष्ट्र.