Ticker

6/recent/ticker-posts

ई नॉमिनेशन ऑनलाईन कसे फाइल करतात?- How To File E-Nomination Online In Marathi? Full Process

मित्रानो आज आपण या आर्टिकल मध्ये माहिती घेणार आहोत की PF अकाउंट मध्ये ई नॉमिनेशन ऑनलाईन कसे सबमीट करतात?- How To Submit E-Nomination Online? Full Process 2022. मित्रानो तुम्ही फ़क्त काही मिनिटात ऑनलाइन ई नॉमिनेशन फाइल करू शकतात.



           मित्रानो तुमचे abk ऑनलाइन टिप्स मराठी ब्लॉग मध्ये स्वागत आहे मित्रानो तुम्हाला या ब्लॉग मध्ये ऑनलाइन सरकारी, डिजिटल, टेक्निकल, सोशल मीडिया रिलेटेड तसेच ऑनलाइन सरकारी अपडेट बद्दल माहिती भेटत राहिल तर आपल्या ब्लॉग ला सब्सक्राइब करायला विसरु नका.

           मित्रानो YouTube वर abk ऑनलाइन टिप्स नावाचे आपले एक चैनल सुद्धा आहे तर तुम्ही विडियो च्या स्वरूपात सुद्धा सरकारी आणि डिजिटल विडियो पाहू शकतात. मित्रानो चला तर मग आज आपण पाहू की ई नॉमिनेशन ऑनलाइन कसे सबमिट करतात? आर्टिकल सुरु करुयात.

ई नॉमिनेशन सबमिट करण्यापूर्वी लक्ष्यात घ्या या गोष्टी:-

          मित्रानो ऑनलाइन pf अकाउंट मध्ये ई नॉमिनेशन सबमिट करण्यापूर्वी आपल्याला काही गोष्टी पूर्ण कराव्या लागतात त्या नंतरच आपण आपले pf नॉमिनेशन ची प्रोसेस पूर्ण करू शकतो. 

  1. मित्रानो ई नॉमिनेशन सबमिट करण्यापूर्वी तुमच्या pf अकाउंट मध्ये तुमची सम्पूर्ण प्रोफाइल ही अपडेट केलेली असावी. तुमचे Marital स्टेटस, तुमचा करंट एड्रेस आणि पेर्मनंत एड्रेस, प्रोफाइल फोटो, etc.
  2. ई नॉमिनेशन सबमिट करण्यापूर्वी तुम्ही तुमची प्रोफाइल मधील सर्वी माहिती नीट तपासून घ्या काही बदल करायचा असेल तर तो तुम्ही आधीच करूण घ्या.
  3. तुमची pf अकाउंट मध्ये KYC झालेले असणे महत्वाचे आहे.
  4. तुमच्या pf अकाउंट ला म्हणजेच UAN (यूनिवर्सल अकाउंट नंबर) ला मोबाइल नंबर लिंक असणे महत्वाचे आहे.
  5. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुमच्या आधार कार्ड ला मोबाइल नंबर असणे फार महत्वाचे आहे.
          मित्रानो ई नॉमिनेशन सबमिट करण्यापूर्वी तुम्ही वरील सर्व गोष्टी आपल्तया pf अकाउंट मध्ये पूर्ण आहे की नाही हे  तपासून घ्या आणि त्या नंतरच ई नॉमिनेशन फाइल करा.

ई नॉमिनेशन फाइल करण्यासाठी कोणते डाक्यूमेंट्स ची गरज असते?:-

          मित्रानो तुम्हाला ई नॉमिनेशन ऑनलाइन फाइल करण्यासाठी डाक्यूमेंट्स ची गरज भासणार आहे ते डाक्यूमेंट्स कोणते आहे ते आपण पाहू.

  1. मित्रानो आपल्या pf अकाउंट ला ज्या व्यक्तीला नॉमिनी म्हणून जोडायचे आहे त्या व्यक्तीचा एक पासपोर्ट साइज़ फोटो आणि या फोटो ची साइज़ 3.5cm * 4.5cm एवढी असायला हवी.
  2. ज्या व्यक्तीला नॉमिनी लावायचे आहे त्या व्यक्ति चे आधार कार्ड नंबर आणि एड्रेस ची तुम्हाला आवश्यकता असेल.
  3. मित्रानो जेव्हा pf अकाउंट मध्ये ई नॉमिनेशन करण्याची सुविधा देण्यात आलेली होती तेव्हा आपल्याला बैंक अकाउंट ची सुध्हा गरज होती पण काही कालावधी नंतर EPFO कडून ई नॉमिनेशन च्या प्रोसेस मधून बैंक अकाउंट ची डिटेल्स ऐड करण्याचे आप्शन हे डिलीट करण्यात आलेले आहे. यामुले आता तुम्हाला बैंक अकाउंट ची या ठिकाणी काही आवश्यकता नाही.
           मित्रानो या वरील प्रमाणे तुम्हाला ई नॉमिनेशन ऑनलाइन फाइल करताना डाक्यूमेंट्स ची आवश्यकता असेल..

ई नॉमिनेशन ऑनलाईन कसे फाइल करतात?- How To File E-Nomination Online? Full Process In Marathi:-

          मित्रानो आता आपण पाहू की ई नॉमिनेशन ऑनलाईन कसे फाइल करतात?- How To File E-Nomination Online? Full Process In Marathi.

  1. मित्रानो सर्व प्रथम तुम्हाला epfo च्या यूनिफाइड मेम्बर होम या वेबसाइट वर यायचे आहे या वेबसाइट पेज वर आल्या नंतर तुम्हाला या ठिकाणी आपल्या UAN नंबर आणि पासवर्ड च्या मददतिने आपल्या pf अकाउंट मध्ये लॉग इन करायचे आहे.
  2. मित्रानो pf अकाउंट मध्ये ऑनलाइन ई नॉमिनेशन फाइल करण्यापूर्वी आपली pf अकाउंट ची प्रोफाइल पूर्णपणे अपडेट करून घ्या वर सांगितल्या प्रमाणे. या नंतर मित्रानो तुम्हाला मैनेज या आप्शन वर क्लिक करून ई नॉमिनेशन या आप्शन वर क्लिक करायचे आहे.
  3. यानंतर मित्रानो तुम्हाला तुमची फॅमिली आहे की नहीं हे सेलेक्ट करायची आहे फॅमिली आसेल तर YES हे आप्शन सेलेक्ट करा. फॅमिली नसेल तर NO हे आप्शन सेलेक्ट करू. पण मित्रानो आपली फॅमिली आहे तर आपण या ठिकाणी YES हे आप्शन सेलेक्ट करणार आहे.
  4. मित्रानो आता तुम्हाला नॉमिनी ची सम्पूर्ण डिटेल्स माहिती या ठिकाणी भरायची आहे. जसे की नॉमिनी चा आधार नंबर, पूर्ण नाव, जन्म तारीख, जेंडर, रिलेशन, एड्रेस, आणि नॉमिनी चा एक फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे.
  5. या नंतर तुम्हाला कंसेंट द्यायचे आहे.
  6. मित्रानो तुम्हाला तुमच्या pf अकाउंट ला एका पेक्षा ज्यास्त नॉमिनी लावायचे असेल तर तुम्ही लावू शकतात यासाठी तुम्हाला या ठिकाणी ADD ROW हे आप्शन देण्यात येते आणि तुम्ही तुमच्या फॅमिली मधून दुसर्या व्यक्ति ला नॉमिनी म्हणून लावू शकतात.
  7. या नंतर मित्रानो तुम्हाला सेव फॅमिली डिटेल्स या आप्शन वर क्लिक करून तुम्हाला ही माहिती सेव करायची आहे.
  8. मित्रानो नॉमिनी ला सेलेक्ट करून नॉमिनी ला किती परसेंट मध्ये रक्कम द्यायची आहे ते परसेंट तुम्हाला या ठिकाणी लिहून सेव EPF नॉमिनेशन या आप्शन वर क्लिक करायचे आहे.
  9. मित्रानो तुम्हाला या ठिकाणी EPS नॉमिनेशन सुद्धा करावे लागते त्यासाठी तुम्ही ज्या नॉमिनी ला EPF नॉमिनेशन मध्ये ऐड केले त्याच नॉमिनी ला तुम्हाला EPS नॉमिनेशन मध्ये ऐड करायचे आहे.
  10. सर्वी माहिती परत एकदा ईपीएस नॉमिनेशन मध्ये लिहून तुम्हाला सेव ईपीएस नॉमिनेशन डिटेल्स या आप्शन क्लिक करायचे आहे.
          मित्रानो लक्ष्यात घ्या की ऑनलाइन तुम्ही जेव्हा pf अकाउंट  मध्ये ई नॉमिनेशन फाइल करतात तेव्हा या प्रोसेस मध्ये तुम्हाला EPF आणि EPS नॉमिनेशन असे दोन नॉमिनेशन डिटेल्स ऐड करावे लागते. माहिती सेव झाल्या नंतर तुम्ही तुमची माहिती  परत एकदा दुरुस्त सुद्धा करू शकतात.

  1. मित्रानो आता आपल्याला आपले ई नॉमिनेशन ई साइन करायचे आहे. या साठी या ठिकाणी आपल्याला इ सिग्न या आप्शन वर क्लिक करायचे आहे.
  2. मित्रानो या ठिकाणी या इ साइन च्या प्रोसेस मध्ये तुम्हाला PF खातेदाराचा (PF अकाउंट होल्डर चा) आधार नंबर किंवा वर्चुअल आईडी लिहून ओटिपी च्या माध्यमातून ई साइन करावे लगते.
  3. आणि या नंतर तुमचे ई नॉमिनेशन पूर्णपणे ऑनलाइन फाइल होते.
          मित्रानो एक महत्वाची बाब म्हणजे तुम्हाला जर वाटले की आपल्याला आपल्या PF अकाउंट चे नॉमिनी बदलवायचे आहे तर तुम्ही नविन ई नॉमिनेशन सुद्धा फाइल करू शकतात अशी सुविधा EPFO कडून कर्मचा-याना देण्यात आलेली आहे.

           मित्रानो ई नॉमिनेशन ऑनलाईन कसे फाइल करतात?- How To File E-Nomination Online? Full Process In Marathi या विषयावर मी माझ्या abk ऑनलाइन टिप्स युट्युब चैनल वर एक सम्पूर्ण विडियो बनवलेली आहे ती विडियो तुम्ही एकदा नक्की पहा.

          मित्रानो आजचा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला कमेंट करूण नक्की सांगा आणि अश्याच ऑनलाइन सरकारी आणि डिजिटल माहिती साठी abk ऑनलाइन टिप्स यूट्यूब चैनल ला आणि ब्लॉग ला सब्सक्राइब करायला विसरु नका. चला मित्रानो भेतुया एका नविन आर्टिकल मध्ये एका नविन माहिती सोबत जय हिन्द जय महाराष्ट्र.