Ticker

6/recent/ticker-posts

Lek Ladki Yojana Maharashtra 2023 | १८ व्या वर्षी मुलींना ७५ हजार रुपये लेक लाडकी योजना महाराष्ट्र |

Lek Ladki Yojana Maharashtra 2023 | १८ व्या वर्षी मुलींना ७५ हजार रुपये लेक लाडकी योजना महाराष्ट्र


Lek Ladki Yojana Maharashtra 2023, १८ व्या वर्षी मुलींना ७५ हजार रुपये लेक लाडकी योजना महाराष्ट्र, lek ladki yojana maharashtra, yojana, mahila yojana


Lek Ladki Yojana Maharashtra 2023 – नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्याचा २०२३ चा अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे आणि त्यामध्येच ‘लेक लाडकी’ योजना नव्या स्वरूपात जाहीर करण्यात आलेली आहे तर लेक लाडकी ही योजना नक्की काय आहे?, महाराष्ट्र लेक लाडकी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणते?, लेक लाडकी योजनेचे फायदे कोणते?, लेक लाडकी योजनेसाठी पात्रता काय आहे? या योजनेची संपूर्ण माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर ही माहिती आवडली तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. (Lek Ladki Yojana Maharashtra 2023)


लेक लाडकी योजना काय आहे?:- 

          महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुरुवारी ९ मार्च २०२३ रोजी  विधानसभेत आगामी आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. यावेळी माननीय देवेंद्र फडणवीस यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा केली. यामध्ये ‘लेक लाडकी’ ही योजना अत्यंत लक्षवेधी ठरली. 

          राज्य शासनाच्या या नव्या योजनेचा लाभ पिवळ्या आणि केशरी कार्डधारक कुटुंबातील मुलींना मिळणार आहे. त्यानुसार मुलीच्या जन्मानंतर तिच्या नावावर ५००० रुपये जमा केले जातील. त्यानंतर पहिलीत असताना ४०००, सहावीत असताना ६००० आणि मुलगी अकरावीत गेल्यानंतर तिच्या खात्यात ८००० रुपये जमा केले जातील. लाभार्थी मुलीचे वय १८ झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये रोख मिळतील, असे महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प २०२३ मध्ये सांगितले आहे.


Lek Ladki Yojana Maharashtra 2023, १८ व्या वर्षी मुलींना ७५ हजार रुपये लेक लाडकी योजना महाराष्ट्र, lek ladki yojana maharashtra, yojana, mahila yojana


लेक लाडकी योजनेसाठी पात्रता काय आहे?:- 

  1. या नवीन योजनेचा लाभ योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या जवळ पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे.
  2. मुलगी ही महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे.

लेक लाडकी योजनेचे फायदे कोणते?:- 

  1. लेक लाडकी योजनेनुसार मुलीच्या जन्मानंतर तिच्या नावावर 5000 रुपये जमा होतील.
  2. रु. ४००० चौथी वर्गात असताना,
  3. रु. ६००० सहाव्या वर्गात आणि
  4. मुलीने 11वीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिच्या खात्यात 8000 रुपये जमा केले जातील.
  5. लाभार्थी मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये रोख मिळतील.

महाराष्ट्र लेक लाडकी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणते?:-

  1. अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असावा
  2. लाभार्थीचे आधार कार्ड
  3. अधिवास प्रमाणपत्र
  4. फॅमिली रेशन कार्ड (केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड)
  5. पासबुकसह बँक खाते
  6. पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
  7. मोबाईल नंबर
  8. उत्पन्नाचा दाखला 

          मित्रानो ९ मार्च २०२३ रोजी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हा सदार करण्यात आला आणि या अर्थसंकल्प मध्ये बरेच काही नविन योजनाची माहिती देण्यात आली. लेक लड़की योजना आता नविन रुपात आलेली आहे  आणि या Lek Ladki Yojana Maharashtra 2023 बद्दल या आर्टिकल मधून तुम्हाला बरीच माहिती भेटलेली असेल तर हे आर्टिकल आपल्या मित्र परिवारां सोबत नक्की शेयर करा. 



Lek Ladki Yojana Maharashtra 2023 या नविन योजने बद्दल तुमच्या मानत काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की विचारा. जय हिन्द जय महाराष्ट्र

📎मित्रानो अश्याच ऑनलाइन सरकारी आणि डिजिटल माहिती साठी फ़ॉलो, सबस्क्राइब, लाइक, शेयर करायला विसरु नका.

📌Marathi Blog:- Abk Online Tips
📌Marathi Instagram Page:- Abk Online Tips
📌Marathi YouTube Channel:-  Abk Online Tips
📌Marathi Shorts YouTube Channel:-  Marathi Digital Tips
📌English Blog:- Digital Tech Akshay