Ticker

6/recent/ticker-posts

Mahila Sanman Yojana Maharashtra 2023 GR | ST मध्ये महिलांना आता सरसकट अर्धे तिकीट महाराष्ट्र २०२३

Mahila Sanman Yojana Maharashtra 2023 | ST Bus Half Ticket For Woman Maharashtra | ST मध्ये महिलांना आता सरसकट अर्धे तिकीट महाराष्ट्र २०२३ 

          महाराष्ट्र सरकारने आज विधानसभेत अर्थसंकल्प मांडला. यावेळी राज्य सरकारने महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. महिलांना आता एसटी प्रवासांत ५० टक्के सूट मिळणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अर्थसंकल्पीय भाषणात ही योजना जाहीर केली आहे. (Mahila Sanman Yojana Maharashtra 2023) 

Mahila Sanman Yojana Maharashtra 2023, ST Bus Half Ticket For Woman Maharashtra, ST मध्ये महिलांना आता सरसकट अर्धे तिकीट महाराष्ट्र २०२३, women yojana

         मित्रानो ९ मार्च २०२३ रोजी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प हा सादर करण्यात आला आणि या मध्ये महिलांसाठी अनेक नविन योजना आणि नविन उपक्रम घोषित करण्यात आले. मित्रानो तुम्हाला हे माहितच आहे की, ७५ वर्षानंतर ज्येष्ट नागरिकांना मोफत एसटी प्रवास आहे आणि ज्येष्ट नागरिकांना मोफत प्रवास दिल्यानंतर राज्य शासनाने आता पुन्हा एक मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी अर्थ संकल्प सादर करताना महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. (ST Bus Half Ticket For Woman Maharashtra 2023) 

महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प २०२३ चे ठळक वैशिष्ट PDF File


महिला सन्मान योजना: आजपासून एसटी प्रवासात सरसकट 50 % सूट, महिला सन्मान योजना सुरू GR आला : Mahila Sanman Yojana Maharashtra 2023 

          महाराष्ट्र राज्याच्या सन 2023-24 च्या अर्थसंकल्पामध्ये सर्व महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस प्रवास भाडयामध्ये 50% सवलत घोषित केली आहे. सदर घोषणेच्या अनुषंगाने दि. 17-03-2023 पासुन सर्व महिलांना राज्याच्या हद्दीपर्यंत राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या वस प्रवास भाड्यामध्ये ५०% सवलत अनुज्ञेय करण्यात येत आहे. सदर सवलतीची प्रतिपुर्ती शासनाकडुन करण्यात येणार आहे.

Mahila Sanman Yojana Maharashtra Instruction:-

  • सर्व महिलांना रा.प. महामंडळाच्या सर्व प्रकारच्या [ साधी, मिडी / मिनी, निमआराम, विनावातानुकुलीत शयन आसनी, शिवशाही (आसनी), शिवनेरी, शिवाई (साधी व वातानुकुलीत ) इतर इत्यादी बसेसमध्ये ५० % सवलत दि. १७/०३/२०२३ पासुन अनुज्ञेय करण्यात येत आहे. सदरची सवलत ही भविष्यात रा.प. महामंडळाच्या ताफ्यात नव्याने दाखल होणा-या सर्व प्रकारच्या बसेस करिता देखील लागु राहील.
  • सदर योजना ही ‘महिला सन्मान योजना ‘या नावाने संबोधण्यात येत आहे. सदरची सवलत सर्व महिलांना महाराष्ट्र राज्याच्या हद्दी पर्यंत अनुज्ञेय आहे.
  • सदर सवलत शहरी वाहतूकीस अनुज्ञेय नाही.
  • ज्या महिलांनी रा.प. महामंडळाच्या बसेसचे प्रवासाचे आगाऊ आरक्षण तिकीट (Advance Booking) घेतलेले आहे. अश्या महिलांना ५०% सवलतीचा परतावा देण्यात येऊ नये. Mahila Sanman Yojana
  • सवलत अनुज्ञेय केलेल्या दिनांक पुर्वीच्या आगाऊ आरक्षणावर केलेल्या प्रवासाचा परतावा देण्यात येऊ नये
  • सर्व महिलांना प्रवास भाड्यात ५०% सवलत असली तरी या योजनेतील जे प्रवाशी संगणकीय आरक्षण सुविधेव्दारे, विंडो बुकींगव्दारे, ऑनलाईन, मोबाईल एप्प द्वारे , संगणकीय आरक्षणाव्दारे तिकीट घेतील अशा प्रवाशांकडुन सेवा प्रकार निहाय लागु असलेला आरक्षण आकार वसुल करण्यात यावा.
  • सर्व महिलांना प्रवास भाड्यात शासनाने ५०% सवलत दिली असल्याने ५०% प्रवास भाडे आकारले जाणार आहे. त्यामुळे प्रवास भाड्यातील अ.स. निधी व वातानुकुलित सेवांकरीता वस्तु व सेवाकरची रक्कम आकारण्यात यावी.

महिला सन्मान योजना सुचना:- 

  • मॅन्युअल पद्धतीने तिकीट देण्याची कार्यवाही —महिलांना दिलेल्या ५०% सवलतीच्या मुल्याची परिगणित करणेसाठी स्वतंत्र तिकीट छपाई करावी लागेल. सदरची सवलत ही ५०% असल्यामुळे त्या प्रत्येक महिलेस हे मुळ तिकीट वाहकाने दिलेच पाहिजे. (तिकीट रंगसंगती स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.)
  • सर्व महिलांना प्रवास भाडयात ५० % सवलत दयावयाची असली तरी त्याची प्रतिपूर्ती शासनाकडे मागणीसाठी त्यांना ईटीआय ओआरएस कार्यप्रणाली बंद पडल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून छापील तिकीटे देणे आवश्यक आहे. त्यासाठी रु.५/-, रु.१०/- मुल्यवर्गाची मूळ तिकीटे व रु. १०/-, रु. २०/- रु.३०/-, रु.४०/- रु.५०/- व रु. १००/- मुल्यवर्गाची जोड तिकीटे देण्यात यावीत. “Mahila Sanman Yojana”
  • सदरची सवलत इटीआय मशीन मध्ये ७७ क्रमांकावर प्राप्त होईल.
  • लेखाशीर्ष महिलांना देण्यात येणा-या विनामुल्य प्रवास सवलतीच्या रकमेची परिगनणा करणेसाठी स्वतंत्र लेखाशीर्ष देण्यात येत आहे. (याबाबत नंतर कळविण्यात येईल.)
  • वर्षावरील महिलांसाठी ‘अमृत जेष्ठ नागरिक’ योजनेच्या परिपत्रकीय सुचनेनुसार १००% सवलत अनुज्ञेय राहिल.
  • महिला सन्मान योजना ६५ ते ७५ या वयोगटातील महिलांना ‘महिला सन्मान योजना’ हीच सवलत अनुज्ञेय
  • महिला सन्मान योजना ५ ते १२ या वयोगटातील मुलींना यापुर्वी प्रमाणेच ५०% सवलत अनुज्ञेय राहिल. Mahila Sanman Yojana Maharashtra 2023

          एसटी महामंडळाची लालपरी ही ग्रामीण भागाची लाईफ लाईन म्हणून ओळखली जाते. शाळेतील विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठापर्यंत लालपरी सर्वांना आपल्या ठिकाणापर्यंत पोहचवते. एसटी प्रवास सुरक्षित असतो यामुळेच अनेक महिला देखील एसटीतून प्रवासाला प्राधान्य देतात. एसटीतर्फे 65 वर्ष पूर्ण झालेल्यांना अर्धा तिकिटाच्या रकमेत प्रवास होता. त्यानंतर अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेंतर्गत 75 वर्षीय ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या बसमध्ये मोफत प्रवास सवलत देण्यात आली आहे व त्यानंतर आता महिलांना देखील 50% तिकीटात सूट देण्याच निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

          महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील ज्येष्ट नागरिकांना एसटीत मोफत प्रवास सवलत दिली आहे त्याचा फायदा राज्यातील नागरिक घेतच आहे परंतु आता महिलाना सुद्धा याचा लाभ मिळणार आहे. यासाठी महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. (mahila sanman yojana maharashtra 2023) 


Download Mahila Sanman Yojana Maharashtra 2023 Government GR 👉Click Here👈


ST Bus Half Ticket For Woman Maharashtra, ST मध्ये महिलांना आता सरसकट अर्धे तिकीट महाराष्ट्र २०२३, Bus Half Ticket For Woman Maharashtra, women yojana


Mahila Sanman Yojana Maharashtra 2023 | MSRTC मध्ये महिलांना आता अर्धे तिकीट महाराष्ट्र २०२३ :- 

          मित्रानो नुकत्याच मांडलेल्या अर्थसंकल्पात शिंदे-फडणवीस सरकारकडून सर्वच वयोगटातील महिलांना एसटीच्या तिकिटामध्ये तब्बल ५० टक्के सूट देण्याचे जाहीर केले आहे. सरकारच्या या निर्णयाची अंमलबजावणीदेखील लगेच सुरू होणार आहे. त्यामुळे महिलांना आता ५० टक्के सवलत घेत राज्यात कोठेही एसटीने प्रवास करता येणार आहे.

          मित्रानो एसटीच्या तिकिटामध्ये सवलत देताना पूर्वी काही अटी घातल्या जात होत्या. विशिष्ट वयोमर्यादा असणाऱ्या ज्येष्ठांनाच कमी तिकिटाचा लाभ घेता येत होता. मात्र, सरकारने महिलांसाठी घोषित केलेल्या ५० टक्के तिकिटाच्या सवलतमध्ये कोणतीही अट ठेवली नाही. सरसकट सर्वच महिलांना तिकिटात ५० टक्के सवलत मिळणार आहे.

          महिलांना प्रवास करताना सुरक्षित प्रवासाची हमी एसटीमध्ये मिळतेच. त्यात आता महिलांना एसटीने तिकिटामध्ये ५० टक्के सवलत दिली असल्याने पूर्वीपेक्षा अधिक महिला एसटीने प्रवास करतील, त्यामुळे एसटीचे उत्पन्नदेखील वाढेल.

Download Mahila Sanman Yojana Maharashtra 2023 Government GR 👉Click Here👈

          मित्रानो लाखो महिलांना होणार फायदा – २०११ च्या जनगणनेनुसार पुणे जिल्ह्यातील महिलांची संख्या ही ४४ लाख ९० हजार इतकी आहे. मात्र, आता या संख्येत मागील दहा वर्षांत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे ५० टक्के तिकीट दर सवलतीचा फायदा लाखो महिलांना होणार आहे.


📎मित्रानो अश्याच ऑनलाइन सरकारी आणि डिजिटल माहिती साठी फ़ॉलो, सबस्क्राइब, लाइक, शेयर करायला विसरु नका.

📌Marathi Blog:- Abk Online Tips
📌Marathi Instagram Page:- Abk Online Tips
📌Marathi YouTube Channel:-  Abk Online Tips
📌Marathi Shorts YouTube Channel:-  Marathi Digital Tips
📌English Blog:- Digital Tech Akshay