Ticker

6/recent/ticker-posts

Mahajyoti Free Tablet Yojana Registration Maharashtra 2023 | फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र 2023 ऑनलाईन अर्ज असा करा

Mahajyoti Free Tablet Yojana Registration | फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र 2023 ऑनलाईन अर्ज असा करा


          नमस्कार मित्रानो Abk Online Tips या मराठी युट्युब चैनल मध्ये तुमचे परत एकदा स्वागत आहे. मित्रानो आज आपण या आर्टिकल मध्ये माहिती घेणार आहोत की, Mahajyoti Free Tablet Yojana Registration Maharashtra 2023 (फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र 2023) काय आहे?,  या योजनेची पात्रता काय आहे? या योजनेची उद्दिष्ट काय आहे?, फ्री टेबलेट योजनेची नियम व अटी काय आहे? सम्पूर्ण माहिती या आर्टिकल मध्ये आहे तर हे आर्टिकल सम्पूर्ण नक्की वाचा.


Mahajyoti Free Tablet Yojana Registration Maharashtra 2023, फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र 2023 ऑनलाईन अर्ज असा करा, free tablet yojana maharashtra

Mahajyoti Free Tablet Yojana Registration Maharashtra 2023 (फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र 2023) काय आहे?:-

          मित्रानो महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर मार्फत राज्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत टॅबलेट, इंटरनेट, पुस्तके, ऑनलाईन प्रशिक्षण आणि मोफत मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाते.

          मित्रानो महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती- विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून MHT-CET/JEE / NEET 2025 करीता पुर्व प्रशिक्षण या योजने अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहे. महाज्योती मार्फत MHT-CET/JEE / NEET परिक्षा पुर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येते. तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट व 6 GB इंटरनेट डाटा प्रत्येक महिन्याला पुरविण्यात येते.


फ्री टॅबलेट (Mahajyoti Free Tablet Yojana) योजनेचे उद्दिष्ट्य काय आहे?:-

          महाज्योतीच्या या योजनेच्या माध्यमातून सन २०२१ मध्ये राज्यातील ११ वी मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जेईई (JEE), नीट (NEET) आणि सीईटी (CET) परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट्य आहे.

          मित्रानो दहावी नंतर अनेक विद्यार्थ्यांना इंजिनिअर (Engineering) आणि मेडिकलसाठी (Medical) तयारी करायची असते. मात्र, आर्थिक परिस्थिती नसल्याने महागडे कोचिंग क्लासेस लावणं त्यांना शक्य होत नाही. अश्या गरीब विद्यार्थ्यांचेइंजिनीरिंग आणि मेडिकल मध्ये प्रवेश घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाज्योती संस्थेने हा ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे.


फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र 2023 योजनेच्या लाभासाठी पात्रता काय आहे?:- 

  1. उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  2. उमेदवार हा इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा.
  3. उमेदवार हा नॉन-क्रिमिलेअर उत्पन्न गटातील पाहिझेल.
  4. जे विद्यार्थी सन 2023 मध्ये 10 वी ची परिक्षा देत आहेत ते विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र असून त्या विद्यार्थ्यांनी अर्ज करतांना 10 वी चे प्रवेश पत्र व 9 वी ची गुणपत्रिका जोडावी.
  5. विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेणारा असावा. ज्या बाबतची कागदपत्रे त्याने भविष्यात सुचनांनूसार अपलोड करणे आवश्यक आहे. “Mahajyoti Free Tablet Yojana Registration Maharashtra 2023”


फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र 2023(Mahajyoti Free Tablet Yojana Registration Maharashtra 2023) ला अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहे?:-

  1. 9 वी ची गुणपत्रिका
  2. 10 वी परिक्षेचे ओळखपत्र (प्रवेश पत्र)
  3. आधार कार्ड
  4. रहिवासी दाखला 
  5. जातीचे प्रमाणपत्र
  6. वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र.
  7. फोटो 


फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र 2023 साठी अर्ज कसा करावा?:-

         मित्रानो महाज्योतीच्या संकेतस्थळावर जाऊन Notice Board मधील “Application for _CET/JEE/NEET 2025 Training” यावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा. अर्जासोबत ‘ब’ मध्ये नमूद कागदपत्रे स्वाक्षांकीत करुन स्पष्ट दिसतील असे स्कॅन करुन अपलोड करावे. [Mahajyoti Free Tablet Yojana Registration]


👉फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र 2023 योजनेचा सम्पूर्ण तपशील येथे तपासा Click Here


फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र 2023 अटी व शर्ती कोणत्या आहे?:-

  • अर्ज करण्याचा अंतिम दि.31/03/2023 आहे.
  • पोस्टाने किंवा ई-मेल व्दारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्विकारणे याबाबतचे सर्व अधिकार है। व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती यांचे राहतील.
  • अर्ज भरतांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या Call Centre वर संर्पक करावा :- संर्पक क्र- 0712-2870120/21 E-mail Id : mahajyotijeeneet24@gmail.com
  •  10 वी चा निकाल लागल्यावर विद्यार्थ्यांकडून 10 वी ची गुणपत्रिका, विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला (बोनाफाईट सर्टिफिकेट) व MHT-CET / JEE / NEET या परिक्षेची तयारी करत आहोत असे हमीपत्र मागविण्यात येतील. "Mahajyoti Free Tablet Yojana Registration Maharashtra 2023"


👉फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र 2023 (Mahajyoti Free Tablet Yojana Registration) योजनेची Advertisement डाउनलोड करा. Click Here

          महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ( महाज्योती), नागपूर या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेकडुन MHT-CET/JEE/NEET 2025 परीक्षेच्या MHT-CET/JEE/NEET – 2025 – या परिक्षेच्या मोफत ऑनलाईन पुर्व तयारीसाठी OBC / VJNT / SBC या संवर्गातील इच्छुक व पात्र उमेदवारांकडुन ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यासाठी टॅब वितरणाकरीता संबंधितांनी www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर सुचना फलक / Notice Board मध्ये उपलब्ध “Application for MHT-CET/JEE/NEET 2025 Training ” यावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने

          फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र 2023 योजनेसाठी अंतिम दिनांक 31/03/2023 पर्यंत अर्ज करावा. सदर संकेतस्थळावर अर्जाचा नमुना व तपशिलवार | माहिती उपलब्ध आहे. (Mahajyoti Free Tablet Yojana Registration Maharashtra 2023 | फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र 2023 ऑनलाईन अर्ज असा करा)

          मित्रानो फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र 2023 या योजने बद्दल तुम्हाला या आर्टिकल मधुन सम्पूर्ण माहिती भेटलीच असेल तरी तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की विचारा. जय हिन्द जय महाराष्ट्र.



📎मित्रानो अश्याच ऑनलाइन सरकारी आणि डिजिटल माहिती साठी फ़ॉलो, सबस्क्राइब, लाइक, शेयर करायला विसरु नका.


📌Marathi Blog:- Abk Online Tips
📌Marathi Instagram Page:- Abk Online Tips
📌Marathi YouTube Channel:-  Abk Online Tips
📌Marathi Shorts YouTube Channel:-  Marathi Digital Tips
📌English Blog:- Digital Tech Akshay