Ticker

6/recent/ticker-posts

Ration Card New Update Maharashtra 2023 | रेशन कार्ड बंद होणार, नवीन नियम पहा, धान्य वसूली होणार

Ration Card New Update Maharashtra 2023 | रेशन कार्ड बंद होणार, नवीन नियम पहा, धान्य वसूली होणार

Ration Card New Update Maharashtra 2023, रेशन कार्ड बंद होणार, नवीन नियम पहा, धान्य वसूली होणार, ration card maharashtra new rules, ration card new rule

नमस्कार मित्रानो Abk Online Tips या मराठी ब्लॉग मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. मित्रानो केंद्र सरकार आणि राज्य सरकार रेशन कार्ड संदर्भात अनेक नविन योजना राबवतात परंतु मित्रानो रेशन कार्ड च्या नियमानुसार काही नागरिक हे गैर फायदा घेत असल्याचे केंद्र सरकार च्या निदर्शनास आलेले आहे आणि या साठी आता केंद्र सरकार रेशन कार्ड संदर्भात कठोर पावलं उचलणार आहेत.

Ration Card New Update Maharashtra 2023 | रेशन कार्ड बंद होणार, नवीन नियम पहा, धान्य वसूली होणार – 

          मित्रानो २६ मार्च २०२३ रोजी लोकमत पेपर मध्ये रेशन कार्ड संदर्भात ही बातमी आलेली होती की रेशन कार्ड रद्द होणार. आता अनेक्क्क लोकांचे रेशन कार्ड हे रद्द कसे होणार हे पाहू.

          देशातील नागरिकांसाठी रेशन कार्ड संदर्भात केंद्र सरकारतर्फे अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जात असतात. कोट्यवधी नागरिकांना मोफत अन्नधान्य, तसेच रेशनही पुरविले जाते, परंतु असंख्य लोक या योजनेचा गैरफायदा घेत असल्याचे केंद्र सरकारच्या निदर्शनास आले आहे.

          यामुळे पात्रतेच्या निकषात बसत नसतानाही ही मंडळी रेशन कार्डवर मोफतचे रेशन लाटत आहेत. यामुळे असंख्य पात्र आणि गरजू नागरिक यापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे सरकारने अशांविरोधात कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सरकारने नियम लागू केले आहेत. “Ration Card New Update 2023”

          केंद्र सरकार कडुन नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, जारी केलेल्या निकषांमध्ये बसत नसतील, अशा परिवारांनी आपली रेशनकार्ड स्वतः सरकारकडे जमा करावीत.

          स्वतः रेशन कार्ड रद्द केली नाहीत तर पडताळणी केल्यानंतर खाद्य विभाग कारवाई करून ती रद्द करणार आहे. अशा लोकांविरोधात कायदेशीर कारवाईदेखील केली जाऊ शकते. {Ration Card New Update 2023}

          या नियमानुसार जर रेशन कार्ड जमा केले नाही, तर तपासणीनंतर अशा व्यक्तींचे रेशन कार्ड रद्द करण्यात येणार आहे. तसेच त्या कुटुंबाविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. इतकेच नाही, तर या परिवारांनी आतापर्यंत घेतलेले सर्व रेशन त्यांच्याकडून वसूल करण्यात येणार आहे.


रेशन कार्ड संदर्भात नवे निकष काय आहेत?

          मित्रानो स्वतःच्या कमाईतून विकत घेतलेला 100 चौरस मीटरचा प्लॉट / फ्लॅट / दुकान, चार चाकी गाडी, ट्रॅक्टर, शस्त्र परवाना असल्यास, तसेच गावात कुटुंबाची वार्षिक मिळकत दोन लाख किंवा शहरात कुटुंबाची वार्षिक मिळकत तीन लाख इतकी असलेल्यांना आपले रेशन कार्ड तहसील ऑफिसला जमा करायचे आहे. (Ration Card New Update 2023) 

          तसेच मित्रानो तुम्ही आजुन पर्यंत रेशन कार्ड ला आधार नंबर लिंक केला नसेल तर लवकर रेशन कार्ड ला आधार नंबर लिंक करून घ्या.


रेशन कार्ड बंद करण्याचा फॉर्म:-

          मित्रानो तुम्हाला स्व ईच्छेने रेशन कार्ड योजने मधुन बाहेर पडायचे असेल तर तुम्हाला एक फॉर्म भरून द्यावा लागेल हा फॉर्म कुटुंब प्रमुखाने च भरावा म्हणजे ज्याच्या नावावर रेशन कार्ड असेल त्यांनीच हा फॉर्म भरवा फॉर्म ची लिंक खाली दिलेली आहे. 

          फॉर्म तुम्ही डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढुन सर्व फॉर्म भरून तुमच्या तहसील ऑफिस मध्ये किंवा तुमच्या रेशन धान्य दुकानात हा फॉर्म जमा करावा.

Download Form


📎मित्रानो अश्याच ऑनलाइन सरकारी आणि डिजिटल माहिती साठी फ़ॉलो, सबस्क्राइब, लाइक, शेयर करायला विसरु नका.

📌Marathi Blog:- Abk Online Tips
📌Marathi Instagram Page:- Abk Online Tips
📌Marathi YouTube Channel:-  Abk Online Tips
📌Marathi Shorts YouTube Channel:-  Marathi Digital Tips
📌English Blog:- Digital Tech Akshay