Ticker

6/recent/ticker-posts

Update Documents In Aadhaar Card After 10 Years | १० वर्ष झाली आता आधार कार्ड मध्ये डाक्यूमेंट्स अपडेट करा

 नमस्कार मित्रानो abk ऑनलाइन टिप्स या मराठी ब्लॉग मध्ये स्वागत आहे. मित्रानो UIDAI कडुन आधार कार्ड संबधित एक नविन माहिती एक नविन सुचना सर्व नागरिकांना देण्यात आलेली आहे ती म्हणजे आता तुमच्या आधार कार्ड ला तयार करून १० वर्षापेक्षा ज्यास्त दिवस झाले असतील तर तुम्हाला आधार कार्ड मध्ये POI आणि POA डाक्यूमेंट्स हे अपलोड करावे लागतील.


Update Documents In Aadhaar Card After 10 Years, १० वर्ष झाली आता आधार कार्ड मध्ये डाक्यूमेंट्स अपडेट करा, update documents in aadhaar, aadhaar update

          मित्रानो UIDAI कडुन एक प्रेस रिलीज़ सुद्धा जारी करण्यात आलेली आहे या प्रेस रिलीज़ मध्ये काय सागंन्यात आलेले आहे हे आज आपण संक्षिप्त स्वरूपात पाहणार आहोत तर चला आजचे हे आर्टिकल सुरु करुयात.


आधार कार्ड मध्ये डाक्यूमेंट्स अपडेट करने म्हणजे काय?:- 

          आधार नोंदणी आणि अद्ययावत विनियम, 2016 नुसार; आधार कार्ड धारकाला प्रत्येक १० वर्षा नंतर आधार कार्ड मध्ये POI आणि POA डाक्यूमेंट्स हे अपडेट करावे लागेल यावरून त्या व्यक्तीची अचूक माहिती सरकार ला समझेल आणि त्या व्यक्तीला सरकारी योजनेचा लाभ घेता येईल.

          मित्रानो आधार कार्ड च्या डाटा मध्ये दोन प्रकारचे भाग असतात १ म्हणजे डेमोग्राफिक डेटा आणि २ म्हणजे बायो मीट्रिक डेटा. बायोमेट्रिक डेटा मध्ये तुम्ही आधार सेवा केंद्र मध्ये जाऊनच बदल करू शकतात पण डेमोग्राफिक डेटा मध्ये तुम्ही घरी बसून ऑनलाइन सुद्धा बदल करू शकतात.

  • UIDAI प्रेस रिलीज़ डाउनलोड येथे करा Click Here

          या व्यतिरिक्त मित्रानो ज्या व्यक्तींनी गेल्या १० वर्षा पासून आपल्या आधार कार्ड मध्ये कोणत्याही प्रकारचे बदल केलेले नाही अश्या लोकांना त्यांच्या आधार कार्ड मध्ये प्रूफ ऑफ़ आइडेंटिटी (POI) डाक्यूमेंट्स आणि प्रूफ ऑफ़ एड्रेस (POA) डाक्यूमेंट्स अपलोड करावे लागणार आहे.

          आधार कार्ड मध्ये POI आणि POA डाक्यूमेंट्स अपलोड केल्यानंतर सरकार हे लक्ष्यात येईल की आधार कार्ड धारक हां ओरिजिनल आहे आणि तुमचे आधार कार्ड हे नेहमी एक्टिव ठेवण्यात येईल. 

          मित्रानो तुम्ही जर तुमचे डाक्यूमेंट्स आधार कार्ड मध्ये अपडेट केले नाही तर UIDAI तुमचे आधार कार्ड Deactivate करून टाकेल आणि मग तुम्ही आधार कार्ड चा वापर करू शकणार नाही. 


आधार कार्ड मध्ये डाक्यूमेंट्स अपडेट करण्यासाठी किती रुपये लागतात?:-

          मित्रानो आधार कार्ड मध्ये प्रूफ ऑफ़ आइडेंटिटी (POI) डाक्यूमेंट्स आणि प्रूफ ऑफ़ एड्रेस (POA) डाक्यूमेंट्स अपडेट करण्यासाठी आधी तुम्ही घरी बसून ऑनलाइन २५ रुपयात आणि ऑफलाइन म्हणजे आधार सेवा केंद्र मध्ये जाऊन ५० रुपयात करू शकत होते परंतु..... 

          पण मित्रानो आता UIDAI ने आधार कार्ड मध्ये POI आणि POA डाक्यूमेंट्स अपडेट करण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी लागणार नाही असे घोषित केले आहे तुम्ही या प्रेस रिलीज़ मध्ये पाहू शकतात.

          मित्रानो डिजिटल इंडिया च्या प्रश्वभूमि वर UIDAI ने हा निर्णय घेतला आहे की, नागरिक myaadhar पोर्टल वर जाऊन ऑनलाइन फ्री मध्ये दिनांक १५ मार्च २०२३ ते १४ जून २०२३ दरम्यान आधार मध्ये POA आणि POI डाक्यूमेंट्स हे अपडेट फ्री मध्ये करू शकतात. म्हणजे हे काम फ्री मध्ये करण्यासाठी तुमच्या जवळ फ़क्त ३ महीने आहे.


आधार कार्ड मध्ये प्रूफ ऑफ़ आइडेंटिटी साठी कोणते डाक्यूमेंट्स अपलोड करावे लागतील?:- 

          आधार प्राधिकरणाने १ जुलै २०२२ रोजी जारी केलेल्या सूचनेनुसार, POI म्हणजेच ओळखीच्या पुराव्यासाठी फोटो असलेली कागदपत्रे आवश्यक आहेत.

  1. यात पॅन कार्ड, 
  2. ई-पॅन, रेशन कार्ड, 
  3. निवडणूक ओळखपत्र, 
  4. वाहन चालविण्याचा परवाना, 
  5. शस्त्र परवाना, 
  6. फोटो बैंक एटीएम कार्ड, 
  7. फोटो क्रेडिट कार्ड, 
  8. विवाह प्रमाणपत्र, 
  9. किसान फोटो पासबुक,


आधार कार्ड मध्ये प्रूफ ऑफ़ एड्रेस साठी कोणते डाक्यूमेंट्स अपलोड करावे लागतील?:- 

          मित्रानो POA म्हणजेच प्रूफ ऑफ़ एड्रेस पत्त्याच्या पुराव्यासाठी नाव व पत्ता असलेला दस्तऐवज आवश्यक आहे. 

  1. यात पासपोर्ट, 
  2. बँक स्टेटमेंट, 
  3. रेशन कार्ड, 
  4. निवडणूक ओळखपत्र, 
  5. वाहन चालविण्याचा परवाना, 
  6. पेन्शनर कार्ड किंवा किसान पासबुक, 
  7. अपंगत्व कार्ड, 
  8. मनरेगा कार्ड, 
  9. शाळेचे वैध ओळखपत्र, 
  10. शाळा सोडण्याचा दाखला,
  11.  वीज बिल, 
  12. पाणी बिल, 
  13. लँडलाईन फोन बिल, 
  14. पोस्टपेड मोबाइल बिल यांचा समावेश आहे.

आधार कार्ड मध्ये तुम्ही आयुष्यात किती वेळा कोणते बदल करू शकतात?:- 

  • आधार कार्डमध्ये नाव दोन वेळा बदलता येते.
  • जन्मतारीख केवळ एकदाच बदलू शकता.
  • लिंग बदलही केवळ एकदाच शक्य आहे.
  • पत्ता कितीही वेळा बदलू शकता.
  • ही मर्यादा ओलांडल्यानंतरही बदल करायचा असल्यास यूआयडीएआयच्या विभागीय कार्यालयात पुराव्यांसह भेट द्यावी लागेल.

          मित्रानो तुम्ही लवकरात लवकर आपल्या आधार कार्ड मध्ये घरी बसून ऑनलाइन फ्री मध्ये १५ मार्च २०२३ ते १४ जून २०२३ या तारखे दरम्यान प्रूफ ऑफ़ आइडेंटिटी (POI) डाक्यूमेंट्स आणि प्रूफ ऑफ़ एड्रेस (POA) डाक्यूमेंट्स अपलोड करून टाका जेणे करून तुमचे आधार कार्ड एक्टिव राहिल.

📎मित्रानो अश्याच ऑनलाइन सरकारी आणि डिजिटल माहिती साठी फ़ॉलो, सबस्क्राइब, लाइक, शेयर करायला विसरु नका.

📌Marathi Blog:- Abk Online Tips
📌Marathi Instagram Page:- Abk Online Tips
📌Marathi YouTube Channel:-  Abk Online Tips
📌Marathi Shorts YouTube Channel:-  Marathi Digital Tips
📌English Blog:- Digital Tech Akshay