Ticker

6/recent/ticker-posts

पॅन कार्ड रद्द झाले तर काय होईल? | What happens if PAN card is not linked to Aadhaar card?

नमस्कार मित्रानो Abk Online Tips या मराठी ब्लॉग मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. मित्रानो गेल्या ५ ते ६ वर्षा पासुन पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करण्यासाठी सरकार कडुन वारंवार नागरिकांना सूचना देण्यात येत होत्या. वारंवार पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख ही पुढे ढकलण्यात येत होती पण आता इनकम टैक्स डिपार्टमेंट कडुन ३१ मार्च २०२३ पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करण्याची अंतिम मुदत देण्यात आलेली होती.


पॅन कार्ड रद्द झाले तर काय होईल? | What happens if PAN card is not linked to Aadhaar card?

          परंतु मित्रानो आता परत एकदा अर्थ मंत्रालया कडुन पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करण्याची तारीख ही ३० जुन २०२३ पर्यंत देण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्ही पॅन कार्डला आधार कार्ड ३० जुन २०२३ पर्यंत करू शकतात पण या साठी तुम्हाला लेट फी १००० रुपये ही ऑनलाइन द्यावी लागणार आहे.


पॅन कार्डला आधार कार्ड लिंक:-

          मित्रानो ३० मार्च २०२२ रोजी वाणिज्य मंत्रालया कडुन एक सर्कुलर आणि एक प्रेस रिलीज़ देण्यात आलेले होते की पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करण्याची तारीख ही वाढविन्यात आलेली आहे.

  • Pan card link to aadhaar card circular Download Click Here

          मित्रानो या सर्कुलर आणि प्रेस रिलीज़ मध्ये असे सांगन्यात आले की, आता तुम्ही पॅन कार्डला आधार कार्ड ३१ मार्च २०२३ या तारखे पर्यंत करू शकतात पण या साठी तुम्हाला लेट फी लागणार आहेत.

          मित्रानो १ अप्रैल २०२२ ते ३० जून २०२२ या तारखे दरम्यान तुम्हाला पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करण्यासाठी ५०० रुपये लागतील. १ जुलाई २०२२ ते ३१ मार्च २०२३ या तारखे दरम्यान पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करण्यासाठी तुम्हाला १००० रुपये लेट फी लागेल अशी माहिती प्रेस रिलीज़ मध्ये देण्यात आलेली होती.

  • Pan card link to aadhaar card press release Download Click Here

          मित्रानो २८ मार्च २०२३ रोजी अर्थ मंत्रालया कडुन आजुन एक प्रेस रिलीज़ देण्यात आलेले आहे आणि या मध्ये  पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करण्यासाठी ३० जुन २०२३ पर्यंत मुदत वाढ देण्यात आलेली आहे.

  • Download the latest press release of Pan Aadhaar Link 28 march 2023

          मित्रानो इनकम टैक्स डिपार्टमेंट आणि वाणिज्य मंत्रालया कडुन पॅन कार्डला आधार कार्ड लिंक नाही केले तर काय होईल हे सुद्धा सागंन्यात आलेले आहे. तरी सुद्धा आता ही सम्पूर्ण घेऊ की, पॅन कार्ड आधार कार्ड ला लिंक केले नाही तर काय होईल?


पॅन कार्ड रद्द झाले तर काय होईल?:-

१) Bank Account:- मित्रानो तुमच्या जवळ एक एक्टिव पॅन कार्ड नसेल तर तुम्ही कोणत्याही बँकेत अकाउंट ओपन करू शकत नाही. तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी GST नंबर घ्यायचा असेल तर तुम्हाला GST नंबर सुद्धा भेटणार नाही. बैंके मधील सर्व प्रकारच्या कामासाठी तुमच्या जवळ एक एक्टिव पॅन कार्ड असणे आवश्यक आहे.,म 

२) Investment:- मित्रानो तुम्हाला तुमच्या जवळ भविष्यासाठी किंवा ऑनलाइन स्टॉक मार्किट मध्ये इन्वेस्टमेंट करण्यासाठी एक एक्टिव पॅन कार्ड असणे आवश्यक आहे. एक्टिव पॅन कार्ड नसेल तर तुम्ही स्टॉक मार्किट मध्ये, म्यूच्यूअल फण्ड मध्ये कोणत्याही प्रकारची इन्वेस्टमेंट करू शकत नाही.

३) Buying a car, jwellary, selling card, buying home:- मित्रानो तुम्हाला चार चाकी गाडी विकत घ्यायची असेल, गाडी दुसर्या व्यक्तीला विकायची असेल, तुम्हाला सोन्याचे दागिने विकत घ्यायचे असेल तर या कामांसाठी एक एक्टिव पॅन कार्ड असणे आवश्यक आहे कारण ५०००० हजार रुपयाच्या वर तुम्हाला जर देवाण घेवाण करायची असेल तर एक्टिव पॅन कार्ड आवश्यक आहे.

४) क्रेडिट कार्ड:- तुम्ही जर एक क्रेडिट कार्ड ला अप्लाई करत असाल आणि तुमचे पॅन कार्ड हे निष्क्रिय झालेले असेल तर तुम्हाला बैंके कडुन क्रेडिट कार्ड दिले जाणार नाही कारण जो सिबिल स्कोर असतो हा सिबिल स्कोर पॅन कार्ड नेच तयार होतो.

५) लोन:- मित्रानो पॅन कार्ड हे निष्क्रिय झाले असेल तर तुम्ही आर्थिक व्यवहार करू शकणार नाही आणि या कारणामुळे तुम्हाला कोणत्याही बैंके कडुन लोन भेटने अवघड होईल कारण एक्टिव पॅन कार्ड नसल्या ने सिबिल स्कोर हा कमी होऊन जाईल.

६) Demat Account:- तुम्हाला शेयर मार्किट मध्ये इन्वेस्ट करायची असेल, म्यूच्यूअल फण्ड मध्ये इन्वेस्टमेंट करायची असेल तर या साठी तुम्हाला एक demat अकाउंट ची आवश्यकता असते आणि एक एक्टिव पॅन कार्ड नसेल तर तुम्ही demat अकाउंट सुद्धा उघडु शकत नाही.

७) withdrawal मनी above 50000rupees:- बैंके मधुन तुम्हाला ५०००० रुपये पेक्षा ज्यास्त रक्कम काढायचे असेल किंवा ५०००० रूपया पेक्षा ज्यास्त रक्कम जमा करायची असेल तर या कामा साठी बैंके मध्ये तुम्हाला एक एक्टिव पॅन कार्ड तुम्हाला दाखवावे लागते आणि एक्टिव पॅन कार्ड नसेल तर हे काम तुम्ही करू शकणार नाही.

८) KYC:- मित्रानो बैंके मध्ये तुम्हाला कधी न कधी kyc साठी आधार कार्ड, पॅन कार्ड, पत्याचा पुरावा हा द्यावा लागतो आणि kyc डाक्यूमेंट्स मध्ये पॅन कार्ड हे चालु नसेल तर तुमची kyc होणार नाही.

          तुमचे PF चे अकाउंट असेल तर epfo मध्ये सुद्धा तुम्हाला पॅन कार्ड ची kyc ही करावी लागते आणि निष्क्रिय पॅन कार्ड मुळे pf अकाउंट मधुन पैसे काढु शकत नाही.

९) ITR:- मित्रानो तुम्ही जर इनकम टैक्स रिटर्न भरत असाल तर तुम्ही एका निष्क्रिय पॅन कार्ड मुळे इनकम टैक्स रिटर्न भरू शकत नाही. इनकम टैक्स जे पेंडिंग रिफंड असेल ते तुम्हाला भेटणार नाही आणि ते प्रोसेस होणार नाही. एका निष्क्रिय पॅन कार्ड मुळे मोठ्या परसेंटेज ने टैक्स हा कापला जाईल.

तुम्ही एका ठिकाणी कामाला जात असाल आणि त्या ठिकाणी तुमच्या सैलरी मधुन टीडीएस कापला जात असेल तर निष्क्रिय पॅन कार्ड मुळे हा टीडीएस तुम्हाला रिफंड भेटणार नाही.

१०) प्रॉपर्टी:- एका निष्क्रिय पॅन कार्ड मुळे तुम्ही एखादी प्रॉपर्टी सुद्धा विकत घेऊ शकणार नाही कारण या साठी सुद्धा बैंकेत आणि इतर कामांसाठी पॅन कार्ड हे फार महत्वाचे आहे. बैंके मध्ये तुम्ही चेक संदर्भातील कामे सुद्धा करण्यासाठी समस्या येऊ शकतात.

          मित्रानो तुम्ही लवकरात लवकर पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करून घ्या या साठी तुम्हाला ३० जून २०२३ पर्यंत १००० रुपयाची लेट फी भरावी लागणार आहेत.


पॅन कार्डला आधार कार्ड लिंक कसे करावे? - How to link pan card to aadhaar card?:-

          मित्रानो तुम्ही घरी बसून किंवा तुमच्या मोबाइल च्या माध्यमातुन पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करू शकतात या प्रोसेस मध्ये २ स्टेप मध्ये तुम्ही पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करू शकतात.

          सर्व प्रथम तुम्हाला इनकम टैक्स डिपार्टमेंट च्या ऑफिसियल वेबसाइट मध्ये जाऊंन लिंक आधार या आप्शन वर क्लिक करायचे आहे आणि पॅन कार्ड आधार कार्ड चा नंबर इंटर करून validate करायचे तुमचे पॅन कार्डला आधार कार्ड लिंक नसेल तर इनकम टैक्स डिपार्टमेंट कडुन तुम्हाला एक आप्शन देण्यात येईल की या ठिकाणी क्लिक करून पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करा.

          तुम्हाला १००० रुपयाचे पेमेंट करायचे आहे. या नंतर ४-५ दिवस तुम्हाला थांबायचे आहे आणि तुम्हाला हे चेक करायचे आहे की आपले १०० रुपयाचे पेमेंट इनकम टैक्स डिपार्टमेंट कडुन अप्प्रोव झाले आहे की नाही. पेमेंट अप्प्रोव झाले असेल तर तुम्हाला पॅन कार्ड आधार कार्ड नंबर परत इंटर करून तुम्हाला पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करायचे आप्शन वर क्लिक करायचे आहे आणि अश्या पध्दतीने तुम्ही पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करू शकतात.

          मित्रानो आता तुम्हाला हे माहित झाले असेल की पॅन कार्डला आधार कार्ड लिंक केले नाही तर तुम्हाला भविष्यात भरपूर असे प्रोब्लेम्स येतील तुमचे पॅन कार्ड एक्टिव राहावे या साठी तुम्ही ३१ मार्च २०२३ या तारखेच्या आत आधार कार्ड ला लिंक करून घ्या.

📎मित्रानो अश्याच ऑनलाइन सरकारी आणि डिजिटल माहिती साठी फ़ॉलो, सबस्क्राइब, लाइक, शेयर करायला विसरु नका.

📌Marathi Blog:- Abk Online Tips
📌Marathi Instagram Page:- Abk Online Tips
📌Marathi YouTube Channel:-  Abk Online Tips
📌Marathi Shorts YouTube Channel:-  Marathi Digital Tips
📌English Blog:- Digital Tech Akshay