महिला सन्मान बचत पत्र योजना काय आहे?:-
महिला सन्मान बचत पत्र योजना ही भारत सरकारची एक नवीन बचत योजना आहे, ज्यामध्ये फक्त महिला आणि मुलींचे खाते उघडले जाऊ शकते. यामध्ये 2 लाख रुपयांपर्यंत रक्कम तुम्हाला जमा करता येईल, ज्यावर 7.50% दराने व्याज दिले जाईल. तुमचे पैसे या खात्यात 2 वर्षांसाठी जमा केले जातील आणि 2 वर्षानंतर तुमची संपूर्ण ठेव आणि व्याज जोडून तुम्हाला पूर्ण पैसे परत मिळतील. सध्या ही योजना ३१ मार्च २०२५ पर्यंतच सुरू राहणार आहे.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेचे खाते कोण आणि कुठे उघडू शकते?:-
मित्रानो कोणतीही भारतीय महिला किंवा मुलगी तिच्या नावाने महिला सन्मान बचत खाते उघडू शकते या योजने साठी वयाची कुठलीही अट नाही. परदेशी किंवा अनिवासी भारतीय महिलांना हे खाते उघडण्याची परवानगी नाही. इतर सरकारी बचत योजनांप्रमाणेच महिला सन्मान बचत पत्र योजनेचे खातेही पोस्ट ऑफिसमध्ये किंवा इतर राष्ट्रीयकृत बँके मध्ये उघडता येते.
अल्पवयीन मुलीसाठी (18 वर्षांखालील) खाते उघडल्यास, पालक म्हणून तिच्या आईचे नाव देखील खात्यात समाविष्ट केले जाईल. या योजने मध्ये एकाच व्यक्ति साठी खातं उघडल जाऊ शकते.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजने मध्ये किती पैसे जमा करावे लागतील? परत कधी मिळणार?:-
मित्रानो महिला सन्मान बचत पत्र योजनेत तुम्ही कमाल 2 लाख रुपये जमा करू शकता. किमान ठेव मर्यादेबद्दल अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती प्राप्त झालेली नाही, परंतु तज्ञांचे मत आहे की किमान 1000 रुपये जमा करून हे खाते उघडले जाऊ शकते. तुमचे पैसे खाते उघडल्याच्या तारखेपासून 2 वर्षांसाठी जमा केले जातील आणि दोन वर्षांनी तुम्हाला तुमची संपूर्ण ठेव आणि व्याज परत मिळेल.
महिला सन्मान बचत पत्र योजनेचा व्याजदर किती आहे?:-
महिला सन्मान बचत पत्र योजनेवर सरकार दरवर्षी ७.५% दराने व्याज देईल. खाते उघडण्याच्या तारखेला लागू होणारा व्याजदर खाते पूर्ण होईपर्यंत समान राहील. दरम्यान, सरकारने व्याजदरात बदल केला तरी, आधीच उघडलेल्या खात्यावर त्याचा परिणाम होणार नाही. ठेवीवरील व्याजाची गणना तिमाही चक्रवाढ व्याजाच्या आधारे केली जाईल.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजने मध्ये खाते उघडण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?:-
महिला सन्मान बचत पत्र योजनेचे खाते उघडण्यासाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता असेल.
- खाते उघडण्याचा फॉर्म (पोस्ट ऑफिसमधून उपलब्ध)
- रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटो
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- पत्त्याचा पुरावा
- अल्पवयीन व्यक्ती साठी जन्माचा दाखला आवश्यक आहे.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजने मध्ये गरज भासल्यास दरम्यान पैसे काढू शकतो का?:-
होय, खाते उघडण्याच्या तारखेपासून 1 वर्षानंतर तुम्ही तुमच्या सुरुवातीच्या ठेवीपैकी 40% पर्यंत रक्कम काढू शकता. मात्र या साठी संबधित पोस्ट ऑफिस किंवा बँकेच्या शाखे मध्ये अर्ज करावा लागतो. तसेच ही रक्कम १ वर्ष पूर्ण झाल्यावर आणि ठेवीची रक्कम मुदत सपन्यापूर्वी एकदाच काढता येईल. अल्पवयीन मुलीच्या वतीने खाते उघडलेले असेल तर ही रक्कम काढ़न्यासाठी पालक अर्ज़ करू शकतात.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेची मुदत किती आहे?:-
मित्रानो या योजनेची मुदत २ वर्षाची आहे. ही योजना ३१ मार्च २०२५ पर्यन्त उपलब्ध असेल म्हणजे या योजने पैसे गुंतवणुकीचा शेवटचा दिवस ३१ मार्च २०२५ असेल या नंतर या योजने मध्ये गुंतवणुक करता येणार नाही.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेची मुदत पूर्ण झाल्यावर काय होईल?
मित्रानो या योजने मध्ये खाते उघडलेच्या तारखे पासुन २ वर्ष पूर्ण झाल्यावर खाते परिपक्व होईल आणि खात्यातील जमा रक्कम ठेविदाराला परत मिळेल. मात्र यासाठी ठेविदाराला संबधित पोस्ट ऑफिस किंवा बँकेच्या शाखेत अर्ज़ करावा लागेल.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजने मध्ये खाते वेळेपूर्वी बंद केले तर काय होईल?:-
मित्रानो ठेवीदाराला काही कारणामुळे खाते मुदतीपूर्वी बंद करायचे असेल या साठी काही नियम देण्यात आलेले आहे. या योजने मध्ये मुदतीपूर्वी खातेदाराचा मृत्यू झाला तरच मुदतीपूर्वी खाते बंद करू शकतात. किंवा खाते दाराला काही आजार जडल्यास ज्यामुळे त्यांना पैश्याची गरज भासली तर किंवा अल्पवयीन खातेदारांच्या पालकांचा मृत्यू झाल्यानंतर खाते चालू ठेवणे शक्य नसेल तर खाते मुदतीपूर्वी बंद करता येईल. खाते जर तुम्ही बंद केले तर तुम्हाला ७.५% दराने व्याज भेटेल.
महिला सम्मान बचत पत्र योजने मध्ये तुम्ही खाते चालू करून ६ महिने झाल्यावर खाते तुम्ही बंद करू शकतात. अश्या प्रकारे तुम्ही खाते बंद केल्यास तुम्हाला नमूद केलेल्या व्याजदरा पेक्षा २% व्याजदर कमी असेल.
मित्रानो या आर्टिकल च्या माध्यमातुन तुम्हाला हे समझले असेल कि, महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना काय आहे? - Mahila Bachat Samman Yojana 2023 Full Information. मित्रानो तरी सुद्धा या योजने बद्दल तुमच्या मनात काही प्रश असतील तर कंमेंट करून नक्की विचारा
Social Plugin