Ticker

6/recent/ticker-posts

What is QR Code Full Information In Marathi | QR कोड म्हणजे काय? |

QR कोड म्हणजे काय? | What is QR Code in Marathi

What is QR Code Full Information In Marathi?, What is QR Code, QR कोड काय आहे?, क्यू आर कोड चा वापर कसा होतो?, क्यू आर कोड चे प्रकार कोणते आहे?,


          मित्रानो आज आपण या आर्टिकल मध्ये माहिती घेऊ की QR कोड काय आहे? क्यू आर कोड चा वापर कसा होतो? क्यू आर कोड चे प्रकार कोणते आहे? मित्रानो क्यू आर कोड (QR Code) बद्दल सम्पूर्ण माहिती आज आपण या आर्टिकल मध्ये घेणार आहोत तर हे आर्टिकल सम्पूर्ण नक्की वाचा. तर चला मित्रानो आजचे आर्टिकल सुरु करुयात.


QR कोड काय आहे? - What is QR Code in Marathi:- 

          मित्रानो QR कोड या शब्दाचा फूल फॉर्म क्विक रिस्पॉन्स कोड (Quick Response Code) आहे. QR कोड हे चौरसआकृती बारकोड (2-D बारकोड) असतात.QR कोड जपानमध्ये सर्वप्रथम विकसित केले गेले आणि वापरले गेले होते.QR कोड हा मशीन-वाचनीय माहिती संग्रहित करण्याचा एक मार्ग आहे.

          मित्रानो QR कोडमध्ये विविध प्रकारचा डेटा आपण समाविष्ट करू शकतो.जसे की एखादा मजकुर,वेबसाईट,ईमेल एड्रेस, फोन नंबर.

          मित्रानो चौरसकृती जागेत काळे ठिपके आणि पांढऱ्या स्पेसचे नमुने वापरून QR कोड डेटा संग्रहित करतात.आपण कॅमेरा किंवा स्कॅनर च्या मदतीने हे नमुने स्कॅन करू शकतो.स्कॅन केल्यानंतर आपल्याला त्यातील माहिती समजते.QR कोड स्कॅन करण्याचा मार्ग म्हणजे तुमच्या स्मार्टफोनचा कॅमेरा.स्मार्टफोन मध्ये QR कोड स्कॅन साठी असलेला ऍप आपण वापरू शकतो.

          मित्रानो QR कोड हा बार कोडमध्ये असलेल्या माहितीपेक्षा जास्त माहिती देतो. बारकोड मधील डेटा हा 1-D मध्ये असतो तर QR CODE मधील डेटा 2-D मध्ये.QR कोडचा मोठा फायदा म्हणजे आपण त्यामध्ये हजारो अक्षरांचा डेटा समाविष्ट करू शकतो.बारकोड मध्ये जास्तीत जास्त 20 अल्फान्यूमेरिक कॅरेक्टर असू शकतात.


QR कोड कसा काम करतो? | How QR Code Works in Marathi:- 

          मित्रानो QR कोड ला आपण एक प्रकारची भाषा समजू शकतो.माणूस ही भाषा समजू शकत नाहीत पण मोबाईल डिवाइस, स्कॅनर ही भाषा समजू शकतात.मॉड्यूल हे QR कोडचे मूलभूत घटक असतात.मॉड्यूल म्हणजे काळे-पांढरे ब्लॉक्स असतात ज्यामध्ये डेटा साठवलेला असतो.

          मित्रानो QR कोड बारकोड सारखाच काम करतो.प्रत्येक QR कोडमध्ये काळे चौरस आणि ठिपके असतात ज्यामध्ये विविध माहिती साठवलेली असते.मोबाईल मधील ऍप वापरून किंवा स्कॅनर ने स्कॅन केल्यावर,QR कोड मधील माहिती आपल्याला समजेल अशा रुपात दिसते.ही सगळी प्रक्रिया अगदी काही सेकंदात होते.


QR कोड चे प्रकार | Types of QR Code in Marathi:- 

          QR कोड चे मुख्य दोन प्रकार पडतात.

1. स्थिर QR कोड (Static QR Code):- 

          मित्रानो यामध्ये असे असते की एकदा आपण कोड जनरेट केला की त्यातील माहिती ही फिक्स आणि न बदल करता येणारी असते.जितकी अधिक माहिती यामध्ये साठवली जाईल तितका जास्त दाट QR कोड तयार होईल.

          मित्रानो स्टॅटिक QR कोड मध्ये आपण वेबसाईट लिंक, मजकूर, मोबाईल नंबर, वायफाय नेटवर्कची माहिती, एसएमएस, कॅलेंडर इव्हेंट, ईमेल आयडी


2.गतिमान QR कोड (Dynamic QR Code):- 

          मित्रानो Dynamic QR Code - डायनॅमिक QR कोड मध्ये आपण सहजपणे QR कोडचा प्रकार अपडेट करू शकतो तसेच एडिट आणि बदलू शकतो. डायनॅमिक QR कोड हा बिझनेस व मार्केटिंग साठी चांगला मानला जातो. डायनॅमिक QR कोड मध्ये आपण लिंक सुद्धा देऊ शकतो.

          Dynamic QR Code मध्ये आपण डेटा म्हणून फक्त लिंक टाकू शकतो. आपण डेटा म्हणून टाकलेली लिंक ही डिरेक्ट त्यात दिलेली नसते त्याऐवजी एक दुसरी लिंक दिलेली असते. ती लिंक यूजर ला आपण दिलेल्या लिंक वर पाठवते.


QR कोड चे उपयोग | Uses of QR Code in Marathi:- 

          मित्रानो QR कोड हे विविध प्रकारची माहिती साठवू शकतात त्यामुळे आपण QR कोड अनेक उद्देशांसाठी वापरू शकतो.

  1. मजकूर -एखादा मजकूर आपण पाठवू शकतो.
  2. फोन नंबर -आपला किंवा आपल्या कंपनीचा फोन नंबर आपण देऊ शकतो.
  3. पत्ता- पत्ता पाठवू शकतो.
  4. लिंक – एखाद्या वेबसाईट ची लिंक देऊ शकतो.
  5. पेमेंट्स – QR कोड आपल्या बँक खाते किंवा क्रेडिट कार्डबद्दल माहिती साठवू शकतात.
  6. वायफाय- वायफाय चा पासवर्ड,अन्य माहिती साठवू शकतो.

QR Code स्कॅन करण्याची पद्धत:-

          मित्रानो आजकाल सर्वत्र क्यूआर कोड असतो. तो स्कॅन करणे अतिशय सोपे आहे. त्यासाठी तुम्हाला तुमचा स्मार्टफोन आणि क्यूआर स्कॅनिंग ॲपचा वापर करावा लागेल. गूगलच्या प्ले स्टोअरमध्ये (Google Play Store) काही स्कॅनिंग ॲप्स उपलब्ध आहेत, ज्याद्वारे हे काम होऊ शकते. जर तुम्हाला पैशांचे पेमेंट करण्यासाठी कोड स्कॅन करायचा असेल तर ज्या पेमेंट ॲपद्वारे तुम्ही पैसे भरणार असाल त्या ॲपद्वारे कोड स्कॅन करा. जर तुम्ही ॲंड्रॉईड फोन अथवा टॅब वापरत असाल, तर तेथे तुम्हाला अनेक स्कॅनर वेबसाइट मिळतील. ios युजर असाल तर आयफोनसाठी क्यूआर स्कॅनर ॲप डाऊनलोड करू शकता.


निकर्ष:- 

          मित्रानो आज आपण पाहिले की What is QR Code in Marathi |  QR कोड म्हणजे काय? तरी सुद्धा तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की विचारा आणि आजुन काही महत्वाच्या विषयावर तुम्हाला माहिती हवी असेल तर ते विषय कमेंट करून नक्की सांगा.

          मित्रानो डिजिटल आणि सरकारी माहिती तुम्हाला विडियो च्या माध्यमातुन हवी असेल तर माझ्या Abk Online Tips मराठी यूट्यूब चैनल ला subscribe नक्की करा. तर चला मित्रानो भेतुया एका नविन आर्टिकल मध्ये एका नविन विषया सोबत जय हिन्द जय महाराष्ट्र. 


Marathi Blog:- Abk Online Tips
Marathi Instagram Page:- Abk Online Tips
Marathi YouTube Channel:-  Abk Online Tips
Marathi Shorts YouTube Channel:-  Marathi Digital Tips
English Blog:- Digital Tech Akshay