Ticker

6/recent/ticker-posts

Whatsapp Upcoming New Feature In 2023 | व्हॉट्सॲपचे २०२३ वर्षात येणारे नविन फीचर

Whatsapp Upcoming New Feature In 2023 | व्हॉट्सॲपचे २०२३ वर्षात येणारे नविन फीचर 

Whatsapp Upcoming New Feature In 2023, व्हॉट्सॲपचे २०२३ वर्षात येणारे नविन फीचर, whatsapp upcoming new feature 2023, whatsapp new feature  2023,


          मित्रानो व्हॉट्सॲप आपल्या मोबाइल मधील सर्वात आवडते एप्लीकेशन आहे. मोबाइल चे स्क्रीन लॉक उघडल्यानंतर सर्वात पाहिले आपण व्हॉट्सॲप एप्लीकेशन ला उघडतो आणि आता तर व्हॉट्सॲप मध्ये २०२३ या वर्षात नविन नविन सुविधा आणि फीचर येणार आहे. व्हॉट्सॲप २०२३ मधील नविन फीचर कोणते येणार आहे हे आपण या आर्टिकल मध्ये पाहू.

          नमस्कार मित्रानो तुमचे माझ्या Abk Online Tips या मराठी ब्लॉग मध्ये स्वागत आहे. या मराठी ब्लॉग मधून तुम्हाला नविन सोशल मीडिया नेटवर्किंग साईट बद्दल अपडेट भेटत राहतील तसेच ऑनलाइन सरकारी आणि डिजिटल माहिती पण पूर्ण तुम्हाला भेटेल. तर ब्लॉग ला फ़ॉलो नक्की करा.

          मित्रानो व्हॉट्सॲप नेहमीच आपल्या users साठी अनेक नविन नविन खास फीचर्स आणत असते. यापूर्वी कंपनीने मेसेज डिलीट करण्याबद्दलची आणि एकदाच पाहण्यासाठीचे व्ह्यू वन्स अशी प्रायव्हसी, ग्रुप कॉल, ग्रुप सदस्य संख्या, मेसेज फॉरवर्डिंगबाबत काही खास फिचर्स आणले आहेत. नवीन वर्षातदेखील यूजर्सची व्हॉट्सॲप वापरण्याची मजा दुप्पट करण्यासाठी कंपनी काही बेस्ट फिचर्सवर सध्या काम करत आहे.

          व्हॉट्सॲप मध्ये तुम्हाला तारखेनुसार मेसेज शोधणे, व्हॉट्सॲप बिझनेस डिरेक्टरी, व्हॉईस नोट स्टेटस, व्हॉट्सॲप डेस्कटॉप कॉल टॅब, व्हॉट्सॲप डेस्कटॉपसाठी स्क्रीनलॉक असे काही भन्नाट फीचर्स आता येणार आहेत. आता 2023 मध्ये व्हॉट्सॲपचे आणखी नवीन फीचर्स लाँच होणार आहेत. या वर्षी 2023 मध्ये व्हॉट्सॲप बरेच नवीन फीचर्स आणत आहे.

          मित्रानो माहिती घेउयात की व्हॉट्सॲप च्या या येणार्या फीचर बद्दल........


१) व्हॉइस नोट्स –

          व्हॉट्सॲप युजर्स लवकरच स्टेटस पोस्ट करताना स्टेटसमध्ये व्हॉईस नोट्स शेअर करू शकणार आहेत. तुम्ही स्टेटसमध्ये 30 सेकंदांपर्यंतच्या व्हॉइस नोट्स शेअर करू शकणार आहात.


२) व्हॉट्सॲप डेस्कटॉपवर कॉल टॅब –

          व्हॉट्सॲप कॉलिंग आणि व्हिडिओ कॉलचा वापर पाहून व्हॉट्सॲपच्या डेस्कटॉप ॲपवर कॉल टॅब पुढील काही महिन्यांत पाहायला मिळू शकतो.


३) व्हॉट्सॲप व्यवसाय निर्देशिका –

          व्हॉट्सॲप आता यूजर्सचा बिझनेस वाढवण्यासाठी मदत करणाऱ्या बिझनेस व्हॉट्सॲपमध्ये डिरेक्टरीच्या मदतीने यूजर्सला नजीकच्या रेस्टॉरंट, किराणा दुकान, ऑटोमोबाईल सेवा याबाबत माहिती मिळवायला मदत करेल. फक्त यूजरला बिझनेस अकाऊंट करावे लागेल.


४) तारखेनुसार मेसेज शोधा –

          यूजर्सना काही दिवसांतच व्हॉट्सॲपवर तारखेनुसार मेसेज पाठवण्याची सुविधा मिळणार आहे. हे फिचर सध्या बीटा वर उपलब्ध असल्याने त्याची टेस्टिंग सध्या सुरू असून ते सर्व यूजर्सना लवकरच वापरायला मिळणार आहे. ज्याने हे युजर्सना कॅलेंडरवर क्लिक करावे लागेल, जे सर्च पर्यायावर दिसेल.


५) व्हॉट्सॲप डेस्कटॉपवर स्क्रीन लॉक –

          व्हॉट्सॲप डेस्कटॉपवर बायोमेट्रिक स्क्रीन लॉक सपोर्ट अजूनपर्यंत आलेले नाही. आता यूजर्सची प्रायव्हसी लक्षात घेऊन व्हॉट्सॲप लवकरच डेस्कटॉप यूजर्ससाठी स्क्रीन लॉक फीचर येईल, त्यापूर्वी ते विंडोज आणि मॅक युजर्ससाठी आणण्यात येईल.

          मित्रानो अश्याच ऑनलाइन सरकारी आणि डिजिटल माहिती साठी फ़ॉलो, सबस्क्राइब, लाइक, शेयर करायला विसरु नका.


Marathi Blog:- Abk Online Tips
Marathi Instagram Page:- Abk Online Tips
Marathi YouTube Channel:-  Abk Online Tips
Marathi Shorts YouTube Channel:-  Marathi Digital Tips
English Blog:- Digital Tech Akshay