Ticker

6/recent/ticker-posts

Download Masked Aadhaar Card Maharashtra 2023 | आधार कार्डचा गैरवापर थांबविण्यासाठी मास्क्ड आधार कार्ड डाउनलोड करावे

Download Masked Aadhaar Card Maharashtra 2023 | आधार कार्डचा गैरवापर थांबविण्यासाठी मास्क्ड आधार कार्ड डाउनलोड करावे 


          मित्रानो आधारकार्ड हा आपल्या सगळ्यांच्याच ओळखीसाठीचा एक महत्त्वाचा आणि अनिवार्य झालेला असे एक डाक्यूमेंट्स आहे. कोणत्याही सरकारी कामासाठी किंवा सरकारी योजनांचा लाभ घेता यावा, बँक खाते उघडण्यासाठी, काही खासगी कामांसाठीही, कामाच्या ठिकाणी आधारकार्ड खूप गरजेचे आहे. पण लक्ष्यात घ्या की आधार कार्डचा फ्रॉडही होऊ शकतो. 

Download Masked Aadhaar Card Maharashtra 2023, आधार कार्डचा गैरवापर थांबविण्यासाठी मास्क्ड आधार कार्ड डाउनलोड करावे, masked aadhaar card download


          फसवणुकीचे आणि आधार कार्डचा गैरवापर करण्याचे प्रकार थांबविण्यासाठी आधारकार्डबाबत केंद्र सरकारने नव्या गाइडलाइन्स आणल्या आहेत. नागरिकांनी मास्क्ड आधार कार्ड डाउनलोड करावे व आधार कार्डची झेरॉक्स देण्याऐवजी लोकांनी फक्त मास्क्ड आधार कार्डच शेअर करावे अशा सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत.

मास्क आधार कार्ड म्हणजे काय?:- 

          मित्रानो मास्क आधार कार्ड म्हणजे या मध्ये तुमच्या आधार क्रमांकाचे पहिले 8 अंक मास्क करून देतात म्हणजे पाहिले ८ अंक हे तुम्हाला दिसत नाही आणि शेवटचे ४ अंक हे तुम्हाला दिसतात. जेव्हा तुम्ही तुमच्या आधारची ही आवृत्ती डाउनलोड कराल तेव्हा तुमचा फोटो, QR कोड, डेमोग्राफिक माहिती आणि इतर तपशील या मास्क आधार कार्ड वर असतात.(What is a masked aadhaar card?)

ई-आधार म्हणजे काय?:- 

          ई-आधार ही आधारची पासवर्ड संरक्षित इलेक्ट्रॉनिक प्रत आहे, ज्यावर UIDAI च्या सक्षम प्राधिकरणाने डिजिटल स्वाक्षरी केली आहे. ई आधार कार्डला UIDAI कडून एक पासवर्ड लावलेला असतो आणि हा पासवर्ड नावाचे पाहिले कैपिटल लैटर आणि तुमचे जन्माचे वर्ष असे ८ अंकांचा हा पासवर्ड असतो. (E-aadhaar card download)

आधार कार्ड तयार करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?:- 

          आधार कार्ड तयार करण्यासाठी UIDAI द्वारे आवश्यक कागदपत्रांची यादी खाली दिली आहे. एकदा तुम्ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमचे आधार कार्ड तयार झाले की, तुम्ही अधिकृत वेबसाइटवरून तुमचे ई-आधार डाउनलोड करू शकता आणि ते प्रिंट करून घेऊ शकता.
  • पासपोर्ट
  • पॅन कार्ड
  • शिधापत्रिका
  • मतदार ओळखपत्र
  • चालक परवाना
  • NREGS जॉब कार्ड
  • फोटो बँक एटीएम कार्ड
  • जन्म प्रमाणपत्र
  • इलेक्ट्रिसिटी बिल 

नवे आधार कार्ड कसे डाऊनलोड करू शकतो?

          मित्रानो ऑनलाइन आणि ऑफलाइन आधार कार्ड सोबत काहीही चुकीचे काम होऊ नए आणि कोणाच्या आधार कार्ड चा गैर वापर होऊ नए यासाठी केंद्र सरकारने मास्क्ड आधारकार्ड (Masked Aadhaar) वापरण्याचा सल्ला दिला आहे. (Download Masked Aadhaar Card Maharashtra 2023)

          मास्क्ड आधारकार्ड हे आधीच्या कार्डसारखेच काम करते फक्त यात जो १२ अंकी आधार नंबर असतो तो मास्क्ड आधारकार्डमध्ये तुमचे १२ अंक दिसत नाहीत, फक्त शेवटचे ४ अंक दिसतात व बाकीच्या अंकाच्या ठिकाणी फुल्ल्या मारलेल्या असतात. यामुळे आधार कार्डचा गैरवापर थांबवता येतो. त्यामुळे तुमच्या आधार क्रमांकाशी लिंक केलेली तुमची सर्व वैयक्तिक माहिती संरक्षित राहते.
फसवणूक टाळण्यास उपयोगी मास्क्ड आधार कार्ड हे एक महत्त्वाचे कागदपत्र बनले आहे.

          सरकारी किंवा खासगी ठिकाणी ओळखीसाठी आधार कार्डची झेरॉक्स मागितली जाते. त्याचा गैरवापर होण्याची शक्यता अधिक असते. तशी भीती केंद्र सरकारच्या लक्षात आल्याने त्यांनी uidai.gov.in या संकेतस्थळावर मास्यड आधार कार्ड डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

          मित्रानो नागरिकांनी या My Aadhaar Portal संकेतस्थळावर जाऊन Mask Aadhaar कार्ड घ्यावे, असे आवाहन सरकारने केले आहे.

मास्क आधार कार्डचा वापर कोठे ग्राह्य धरला जाईल?:- 

  1. कोणत्याही खासगी कामासाठी किंवा सरकारी कामासाठी किंवा सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी, जॉबच्या ठिकाणी तुम्ही मास्क्ड आधारकार्ड वापरु शकता.
  2. हॉटेल, पर्यटनस्थळी किंवा सिनेमा हॉलमध्ये किंवा एखाद्या खासगी संस्थेला तुमचे आधारकार्डची झेरॉक्स घेण्याची किंवा ठेवून घेण्याची परवानगी नाही.
  3. असे केल्यास आधार कार्ड कायदा २०१६ चे उल्लंघन केल्याचा गुन्हा ठरला जातो.
  4. आधार कार्डचा गैरवापर थांबविण्यासाठी मास्क्ड आधार कार्ड डाउनलोड करावे 

मास्क्ड आधार कार्ड मोबाइल मधून असे डाउनलोड करा:-  


           मित्रानो मास्क्ड आधार ऑनलाइन मोबाइल मधून डाउनलोड करण्यासाठी ही विडियो नक्की पहा आणि माझ्या Abk Online Tips या मराठी यूट्यूब चैनल ला sabscribe करायला विसरु नका.




📎मित्रानो अश्याच ऑनलाइन सरकारी आणि डिजिटल माहिती साठी फ़ॉलो, सबस्क्राइब, लाइक, शेयर करायला विसरु नका.

📌Marathi Blog:- Abk Online Tips
📌Marathi Instagram Page:- Abk Online Tips
📌Marathi YouTube Channel:-  Abk Online Tips
📌Marathi Shorts YouTube Channel:-  Marathi Digital Tips
📌English Blog:- Digital Tech Akshay