Ticker

6/recent/ticker-posts

EPS 95 Higher Pension Online Apply 2023? - Higher Pension साठी ऑनलाइन अप्लाई कसे करावे?

नमस्कार मित्रानो तुमचे Abk Online Tips या मराठी ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रानो आज आपण या आर्टिकल मध्ये EPS ९५ Higher Pension बद्दल सम्पूर्ण माहिती घेणार आहोत. EPS ९५ Higher Pension साठी कोण पात्र आहे? EPS ९५ Higher Pension साठी कोण अपात्र आहे? EPS ९५ Higher Pension साठी ऑनलाइन कसे अप्लाई करू शकतो? जॉइंट आप्शन फॉर्म कसा डाउनलोड करायचा? सर्वी माहिती या आर्टिकल मध्ये आहे तर मित्रानो हे आर्टिकल सम्पूर्ण नक्की वाचा.


EPS 95 Higher Pension Online Apply 2023?, Higher Pension साठी ऑनलाइन अप्लाई कसे करावे?, EPS95 Higher Pension ला अप्लाई करण्याची शेवटची तारीख कोणती आहे


          मित्रानो सुप्रीम कोर्टाच्या ४ नोव्हेंबर 2022 च्या एक आदेशानुसार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था (EPFO)ने काही नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत, ज्यामुळे तुम्हाला आत्ताच्या नियोजित निवृत्तीवेतनापेक्षा जास्त पेन्शन मिळू शकते.


EPFO म्हणजे काय? - What Is EPFO?:- 

          मित्रानो EPFO म्हणजे Employees Provident Fund Organization. देशभरात सरकारी आणि खासगी संस्थानांमध्ये नोकरी करणाऱ्यांना निवृत्तीनंतरही भविष्यासाठी निधी गोळा करता यावा, यासाठी या संस्थेची स्थापना Employees’ Provident Funds and Miscellaneous Provisions Act, 1952 अंतर्गत करण्यात आली आहे.

          EPFO संस्था प्रामुख्याने दोन गोष्टींचं व्यवस्थापन करते. त्यातली पहिली म्हणजे EPF अर्थात Employee’s Provident Fund. ती रक्कम जी तुम्ही नोकरी करताना साठवलेली असते आणि नोकरी सोडली – रिटायरमेंटच्या वेळी तुम्हाला एकत्र मिळते. या EPF मध्ये तुम्ही जिथे नोकरी करता ती संस्था वा कंपनी आणि तुम्ही अशा दोघांनीही त्यात योगदान दिलेलं असतं. आणि यावर तुम्हाला ठराविक टक्क्यांनी व्याजही मिळतं.

          याशिवाय दूसरी गोष्ट म्हणजे EPS यालाच आपण Employee Pension Scheme असे म्हणतो. EPS अंतर्गत आपल्याला निवृत्तीनंतर दर महिन्याला ठराविक पेन्शन किंवा निवृत्तीवेतन मिळत राहत.


EPF-EPS चं गणित काय ते पाहू?:- 

          मित्रानो कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरही दरमहा काहीतरी पगार मिळत राहावा, या हिशोबाने सरकारने EPSची सुरुवात 1995 साली केली. 

          ईपीएस मध्ये दर महिन्याला कर्मचारी आणि त्याची कंपनी दोघांकडूनही मूळ वेतन आणि महागाई भत्ता (Basic + DA) यांच्या 12-12 टक्के अशा रकमेचा हप्ता जमा केला जातो. यापैकी कर्मचाऱ्याचा पूर्ण 12 टक्के वाटा हा EPF अर्थात Employee Provident Fund मध्ये जातो. तर कंपनीच्या 12 टक्के वाट्याचे दोन भाग होतात – 3.67 टक्के भाग EPF ला जातो आणि 8.33 टक्के जातो EPSला – अर्थात Employee Pension Scheme मध्ये जमा होतो.

          याशिवाय भारत सरकारही कर्मचाऱ्याच्या बेसिक इन्कमच्या 1.16 टक्के वाटा EPSमध्ये टाकतं. म्हणजे कर्मचाऱ्याच्या वाटा EPF मध्येच जातो, EPS पेन्शन स्कीममध्ये जात नाही.


EPS 95 Higher Pension पेशन्स मिळवण्यासाठी कोण पात्र आहे?

          मित्रानो 1995 साली Employee Pension Scheme याची सुरुवात झाली, तेव्हा पेन्शनसाठी पात्र पगाराची मर्यादा होती दरमहा 5000 रुपये. कालांतराने ही मर्यादा वाढवण्यात आली – आधी 6,500 आणि नंतर 1 सप्टेंबर 2014 ला ती 15,000 करण्यात आली. म्हणजे आता ज्यांचं मूळ वेतन 15,000 रुपये आहे, त्यांना त्याच हिशोबाने पेन्शन मिळू शकतं.

          पेन्शन मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांचं वय किमान 58 असावं लागतं आणि त्यांनी किमान दहा वर्षं सेवा करून निवृत्ती घेतलेली असावी. जर ते 50 ते 57 या स्वेच्छानिवृत्ती अर्थात VRS घेतात तर त्यांना कमी पेन्शनसुद्धा मिळू शकते.


EPS बद्दलचा सुप्रीम कोर्टाचा आदेश काय आहे?:- 

          मित्रानो 2014 मध्ये सुप्रीम कोर्टाने या कर्मचारी निवृत्तीवेतन योजनेत दोन मोठे बदल केले - पेन्शनेबल इन्कमची मर्यादा 6,500 वरून 15,000 हजार करण्यात आली. जर कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कंपन्यांना त्यांच्या बेसिक पगाराच्या निर्धारित 8.33 टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम पेन्शन फंडात टाकायची आहे, तर त्यासाठीची परवानगी दिली.

📜 Download Supreme Court Circular Click Here

          म्हणजे ज्यांचा बेसिक पगार 15,000 पेक्षा जास्त होता, जसं की 50000, ते आता 50,000च्या 8.33 टक्के वाटा EPFसाठी देऊ शकतात. म्हणजे त्यांना जास्त पैसे भविष्यासाठी साठवता येतील. 

          याशिवाय, ज्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या जास्त पगारावर EPFचा वाटा द्यायचा होता, त्यांना 1.16 टक्के वाटा पेन्शन फंडासाठीसुद्धा देणं सक्तीचं करण्यात आलं होतं. आणि ज्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे पर्याय निवडले नाहीत, त्यांना बाय डिफॉल्ट 15,000 एवढ्याच पेन्शनेबल इनकमवर EPFमध्ये योगदान देता येईल, असंही सांगण्यात आलं.

          म्हणून या नवीन स्कीमसाठी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कंपन्यांसोबत एक वेगळा फॉर्म EPFO ऑफिसात भरायचा होता, पण कर्मचाऱ्यांना त्यासाठी फक्त सहा महिन्यांचा वेळ देण्यात आला होता. शिवाय या स्कीमची पुरेशी माहिती उपलब्ध नव्हती, असं म्हणत काहींनी ही मुदत वाढवण्याची याचिका सुप्रीम कोर्टात केली.

          आत्ता नोव्हेंबर 2022 मध्ये सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांच्या बाजूने निकाल देत म्हटलं की अधिकाधिक कर्मचाऱ्यांना EPFचा दुरुस्तींचा फायदा मिळावा, यासाठी फॉर्म भरण्याची मुदत चार महिन्यांनी वाढवावी. त्यामुळेच आता EPFO ने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत, ज्या अंतर्गत प्रत्यक्ष बेसिक पगाराच्या आधारे वाढीव EPF योगदानासाठी फॉर्म भरायची मुदत ३ मे २०२३ पर्यंत वाढवण्यात आलेली आहे.

          2014च्या दुरुस्ती विधेयकात आणखी एक गोष्ट बदलण्यात आली होती – पेन्शनेबल इन्कम पूर्वी सेवेच्या शेवटच्या 12 महिन्यांची सरासरी होती, ती आता 60 महिन्यांच्या पगाराची सरासरी घेण्यात आली आहे


EPFO मार्फ़त किती पेन्शन मिळते?:- 

आता तुम्हाला पेन्शन किती मिळेल, यासाठीचा एक सोपा फॉर्म्युला ठरवण्यात आला आहे,

Pension = Pensionable Salary x Pensionable Service / 70.

अर्थात तुमचा पेन्शनयोग्य पगार किती, त्याचा गुणाकार तुम्ही किती वर्षं सेवा केलीत त्याने करून त्याला 70 ने भागायचं आहे. 70 हे आपलं सरासरी आयुर्मान धरण्यात आलं आहे.


EPS 95 Higher Pension साठी कोण अपात्र आहे? 

           मित्रानो जर तुम्ही 1 सप्टेंबर 2014 पूर्वीच EPFOचे सदस्य झाला असाल, म्हणजे 1 सप्टेंबर 2014 आधी तुम्ही नोकरी सुरू केली असेल आणि तुमचं EPF-EPS चे पैसे कापले जात होते, तरच तुम्ही EPS 95 higher pension साठी अप्लाई करू शकतात. जर तुम्ही 1 सप्टेंबर 2014 नंतर रिटायर झालात तरीसुद्धा तुम्ही या स्कीमसाठी फॉर्म भरून अर्ज करू शकता.

           यासाठी तुम्हाला तुमच्या कंपनीसह एक संयुक्त अर्ज भरावा लागेल, जो नंतर कंपनीच्याच मार्फत EPFOला पाठवला जाऊ शकतो. किंवा तुम्ही ऑनलाइन EPFO च्या यूनिफाइड मेम्बर पोर्टल जाऊन ऑनलाइन अप्लाई करू शकतात.


EPS 95 Higher Pension कसे अप्लाई करावे?:- 

          मित्रानो higher pension साठी तुम्ही तुमच्या एम्प्लायर च्या मदतीने सुद्धा अप्लाई करू शकतात आणि स्वता तुम्ही घरी बसून higher pension साठी सुद्धा ऑनलाइन अप्लाई करू शकतात.


EPS 95 Higher Pension Online Apply 2023, Higher Pension साठी ऑनलाइन अप्लाई कसे करावे, EPS95 Higher Pension ला अप्लाई करण्याची शेवटची तारीख कोणती आहे


          मित्रानो EPFO ने higher pension साठी अप्लाई करण्या साठी यूनिफाइड मेम्बर पोर्टल सुविधा दिली आहे. 

१) मित्रानो जे सदस्य १ सप्टेम्बर २०१४ आधी रिटायर्ड झाले आहे आणि या सद्स्यानी जॉइंट आप्शन फॉर्म भरलेला आहे आणि त्याना हा जॉइंट आप्शन फॉर्म validate करायचा आहे त्यांच्या साठी पाहिले आप्शन आहे आणि या साठी तुम्हाला PPO नंबर, मेम्बरचा आधार नंबर, नाव जन्म तारीख epfo च्या रिकार्ड्स मध्ये उपलब्ध पाहिझेल.

          १ सप्टेम्बर २०१४ आधी रिटायर्ड झालेले मेम्बराना validate करण्यासाठी जॉइंट आप्शन फॉर्म अपलोड करावा लागेल. तुमच्या कड़े कोणत्याही प्रकारचा जुना जॉइंट आप्शन फॉर्म नसेल तर तुम्ही ऑनलाइन जॉइंट आप्शन फॉर्म डाउनलोड करून तो एम्प्लायर कडून भरून ऑनलाइन अपलोड करू शकतात.

📄 जॉइंट आप्शन फॉर्म डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 👉 Download Joint Option Form 👈

२) ज्या सदस्याचे EPF-EPS अकाउंट हे १ सप्टेम्बर २०१४ च्या आत सुरु झाले परतु त्या सदस्यांची सर्विस आजपण सुरु आहे आणि त्यानी higher pension साठी अप्लाई केलेच नाही अश्या मेम्बर साठी दुसरे आप्शन देण्यात आले आहे. UAN नंबर, मेम्बरचा आधार नंबर, नाव जन्म तारीख epfo च्या रिकार्ड्स मध्ये उपलब्ध पाहिझेल.


EPS-95 Higher Pension ला अप्लाई करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?:- 

          EPS-95 Higher Pension ला अप्लाई करण्याची शेवटची तारीख ही ३ मे २०२३ पर्यन्त आहे. सुरुवातीला ही तारीख ३ मार्च २०२३ पर्यन्त च होती पण आता EPS-95 Higher Pension ला अप्लाई करण्याची शेवटची तारीख ३ मे २०२३ ही आहे.

📎मित्रानो अश्याच ऑनलाइन सरकारी आणि डिजिटल माहिती साठी फ़ॉलो, सबस्क्राइब, लाइक, शेयर करायला विसरु नका.

📌Marathi Blog:- Abk Online Tips
📌Marathi Instagram Page:- Abk Online Tips
📌Marathi YouTube Channel:-  Abk Online Tips
📌Marathi Shorts YouTube Channel:-  Marathi Digital Tips
📌English Blog:- Digital Tech Akshay