Ticker

6/recent/ticker-posts

How To Find SRC Number Of Ration Card Maharashtra - रेशन कार्ड चा १२ अंकी SRC नंबर कसा शोधायचा?

नमस्कार मित्रानो तुमचे Abk Online Tips या मराठी यूट्यूब चैनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे. मित्रानो आज आपण या आर्टिकल मध्ये माहिती घेणार आहोत की, आपण मोबाइल एप्प च्या मदतीने रेशन कार्ड चा १२ अंकी SRC नंबर हा कसा शोधू शकतो? मित्रानो या आर्टिकला नक्की शेयर करा आणि इतराना सुद्धा तुम्ही SRC नंबर काढून देऊ शकतात.

How To Find SRC Number Of Ration Card Maharashtra, रेशन कार्ड चा १२ अंकी SRC नंबर कसा शोधायचा?, SRC ration card number, mera ration SRC number, SRC

          महाराष्ट्र शासनामार्फत जुने रेशन कार्डच्या क्रमांकाऐवजी नागरिकांना १२ आकडी SRC NUMBER क्रमांक देण्यात आला. त्या १२ अंकी SRC क्रमांकामधे एका कुटुंबातील संपूर्ण व्यक्तींची नावे समाविष्ट करण्यात आली. तसेच प्रत्येक गावातील राशन दुकानदारला एक POS MACHINE देण्यात आली ज्यामध्ये नागरिकांना देण्यात आलेला १२ अंकी SRC क्रमांक टाकल्यानंतर संपूर्ण कुटुंबाची माहिती तसेच त्या कुटुंबाला भेटणारे एकूण रेशन आणि पोचपावती सुद्धा नागरिकांना देण्याची सुविधा करण्यात आली.

            रेशन कार्ड हा एक महत्त्वाचा कायदेशीर कागदपत्र आहे जो पात्र कुटुंबांकडून धान्य खरेदीसाठी वापरला जातो आणि अनुदानित दराने पुरवठा केला जातो. याशिवाय विविध उदाहरणांमध्ये आपला ओळख पुरावा म्हणूनही वापरला जातो. महराष्ट्रातील प्रत्येक राज्य पात्र कुटुंबांना रेशन कार्ड जारी करते.

          सर्व नागरिक “रेशन कार्ड SRC नंबर महाराष्ट्र” शोधत आहेत त्यांच्यासाठी ते पात्र असले पाहिजे. म्हणजेच त्यावैक्ती कडे महाराष्ट्र शासनाचे रेशन कार्ड असणे अनिवार्य आहे. SRC Number find करण्यापूर्वी त्यांनी पात्रतेचे निकष वाचले पाहिजेत. 

  • अर्जदार चे रेशनकार्ड हे महाराष्ट्रातील कायमचे असले पाहिजेत.
  • अर्जदारांकडे महाराष्ट्र राज्यात किंवा इतर कोणत्याही राज्यात इतर कोणतेही रेशन कार्ड नसतील याची काळजी घ्यावी.
  • रेशन कार्ड SRC नंबर महाराष्ट्र पाहण्यासाठी अर्जदाराकडे समोर आधार कार्ड असणे अनिवार्य असेल.


रेशन कार्ड किती प्रकारचे असतात? (Types of Ration Card in Maharashtra):- 

१) AAY अंतोदय अन्न योजना ( पांढरे राशन कार्ड ) :- AAY म्हणजेच Antyodaya Anna Yojana यामध्ये जे नागरीक दारिद्र रेषेखाली मोडत नाहीत म्हणजेच ज्या नागरिकांचे वार्षिक उत्पन्न जास्त आहे अश्या नागरिकांसाठी शासनामार्फत पांढरे राशन कार्ड दिले जाते.

२) BPL ( पिवळे राशन कार्ड ) :- BPL म्हणजेच Below Poverty Line यामध्ये जे लोक दारिद्र्य रेषेखाली मोडतात म्हणजेच ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न खूपच कमी आहे अश्या कुटुंबातील व्यक्तीला शासनमार्फ़त पिवळे रेशन कार्ड दिले जाते.

३) APL ( केशरी रेशन कार्ड ) :- APL म्हणजेच Above Poverty Line यामध्ये जे नागरिक दारिद्र रेषेच्या थोडेवर असतात म्हणजेच ज्यांची परिस्थती बऱ्यापैकी असते अश्या नागरिकांना या प्रकारचे रेशन कार्ड देण्यात येते.

४) AY रेशन कार्ड :- AY म्हणजेच Annapoorna Yojana


रेशन कार्डचे फायदे (Benefits Of Ration Card):- 

          मित्रानो रेशन कार्डमुळे तुम्हांला शासनाकडून अन्न पुरवठा केला जातो ज्यामध्ये गहू, तांदूळ,साखर,डाळ इत्यादी वस्तू दिल्या जातात ज्यामुळे गरीब कुटुंबाचे उदर्निवाह होत असतो. रेशन कार्डमुळे बऱ्याच शासकीय योजनेचा लाभ घेता येतो.

          जे लोक गरीब असतात त्यांना बाजारातून अन्न धान्य महागड्या भावाने आणे परवडत नाही पण रेशन कार्डमुळे शासनामार्फत त्यांना कमी भावात अन्न धान्य पुरवठा केला जातो. रेशन कार्डमुळे बऱ्याच कुटूंबाना २ वेळेसचे जेवण भेटते. दारिद्र रेषेखालील नागरिकांना रेशन कार्डचा खूप फायदा होतो


How To Find Maharashtra Ration Card SRC Number From Mobile 2023  –  आपण मोबाइल एप्प च्या मदतीने रेशन कार्ड चा १२ अंकी SRC नंबर हा कसा शोधू शकतो?:- 

          मित्रानो तुम्ही सर्व प्रथम मोबाइल मध्ये 'मेरा राशन' हे एप्लीकेशन डाउनलोड करा. 'मेरा राशन' एप्प उघडल्यानंतर तुम्हाला एप्लीकेशन च्या डैशबोर्ड मध्ये आधार सीडिंग या आप्शन मध्ये जायचे आहे. 

मित्रानो या ठिकाणी एक गोष्ट लक्ष्यात ठेवा की तुम्ही या आधी रेशन कार्ड ला आपला आधार नंबर हा लिंक केलेला असावा 

          आधार सीडिंग च्या या आप्शन मध्ये तुम्हाला आधार नंबर चे आप्शन सेलेक्ट करायचे आहे आणि कुटुंब प्रमुखाचा किंवा रेशन कार्ड मध्ये ज्या लोकांचे नाव असतील त्यांचा आधार नंबर टाकुन view details वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर रेशन कार्ड सर्वांचे आधार कार्ड लिंक आहे की नाही हे समझेल आणि या पेज मध्ये तुम्हाला कार्ड नंबर च्या समोर तुमच्या रेशन कार्ड चा १२ अंकी SRC नंबर दिसेल.

          मित्रानो अश्या पद्धतीने तुम्ही मोबाइल एप्लीकेशन च्या माध्यमातून रेशन कार्ड चा SRC Number शोधू शकतात.


 महाराष्ट्र रेशनकार्ड अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे:- 

what is src no in ration card? where is src no in ration card? how to find src number in ration card Maharashtra रेशनकार्डसाठी अर्ज करताना अर्जदारांना पुढील कागदपत्रे द्यावी लागतील-

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • मिळकत प्रमाणपत्र
  • वीज बिले / दूरध्वनी बिल
  • गॅस कनेक्शन तपशील
  • बँक पासबुक
  • निवासी भाड्याने घेतल्याची पावती
  • फोटो

मित्रानो तुम्ही मेरा राशन एप्प मधून तुमचा १२ अंकी रेशन कार्ड चा SRC नंबर कसा शोधू शकतात? या विषयावर मी माझ्या Abk Online Tips या मराठी यूट्यूब चैनल वर विडियो बनवलेला आहे तो तुम्ही एकदा नक्की पहा आणि विडियो नक्की इतर मित्रां सोबत शेयर करा म्हणजे त्याना सुद्धा ही माहिती समझेल.

👇 How to find the SRC number of ration card Maharashtra video 👇




📎मित्रानो अश्याच ऑनलाइन सरकारी आणि डिजिटल माहिती साठी फ़ॉलो, सबस्क्राइब, लाइक, शेयर करायला विसरु नका.

📌Marathi Blog:- Abk Online Tips
📌Marathi Instagram Page:- Abk Online Tips
📌Marathi YouTube Channel:-  Abk Online Tips
📌Marathi Shorts YouTube Channel:-  Marathi Digital Tips
📌English Blog:- Digital Tech Akshay