Ticker

6/recent/ticker-posts

या १४ जिल्ह्यात आता रेशन धान्याऐवजी रोख पैसे मिळणार, लवकर हा फॉर्म भरून द्या | Maharashtra State Ration Card New GR 2023

या १४ जिल्ह्यात आता रेशन धान्याऐवजी रोख पैसे मिळणार, लवकर हा फॉर्म भरून द्या | Maharashtra State Ration Card New GR 2023


          नमस्कार मित्रानो Abk Online Tips या मराठी blog मध्ये स्वागत आहे. मित्रानो रेशन कार्ड धारकानसाठी मोठी खुशखबर आहे. आता काही जिल्ह्या मध्ये रेशन धान्य एवजी तुम्हाला थेट पैसे मिळणार आहे या साठी तुम्हाला एक फॉर्म भरून द्यायचा आहे. मित्रानो या योजने साठी कोण पात्र आहे? कोणत्या जिल्ह्या मध्ये ही योजना राबवीन्यात येणार आहे? कोणता फॉर्म तुम्हाला कसा भरायचा आहे आणि हा फॉर्म तुम्हाला कुठे जमा करायचा आहे? ही सर्वी माहिती आपण या आर्टिकल मध्ये पाहणार आहोत तर हे आर्टिकल सम्पूर्ण नक्की पहा.

या १४ जिल्ह्यात आता रेशन धान्याऐवजी रोख पैसे मिळणार, लवकर हा फॉर्म भरून द्या, Maharashtra State Ration Card New GR 2023, maharashtra ration card update,

          मित्रानो महाराष्ट्र राज्य सरकार कडून रेशन कार्ड धारकान साठी एक नविन gr देण्यात आलेला आहे. औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपुर विभागातील वर्धा जिल्ह्यातील एपीएल केशरी शिधा पत्रिकाधारक शेतका-यांना अन्नधान्य ऐवजी थेट रोख रक्कम हस्तातरण योजना सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे.


Maharashtra Ration Card New GR 2023:- 

          अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या संदर्भ क्र. 1 येथील दि. 24-07-2015 च्या शासन निर्णयान्वये राज्यातील औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपिएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांप्रमाणे (प्रतिमाह प्रति सदस्य 5 किलो अन्नधान्य, ₹200 प्रति किलो गहू व ₹3.00 प्रति किलो तांदुळ या दराने) अन्नधान्याचा लाभ देण्यात येत होता.

          सदर योजनेकरिता आवश्यक असलेल्या अन्नधान्याची खरेदी केंद्र शासनाच्या Non NFSA योजनेंतर्गत गहू ₹22.00 प्रति किलो व तांदुळ ₹23.00 प्रति किलो या दराने करण्यात येत होती. तथापि, सदर योजनेंतर्गत यापुढे गहू व तांदुळ उपलब्ध होणार नसल्याचे भारतीय अन्न महामंडळाने त्यांच्या अनुक्रमे दि. 31-05-2022 व दि. 19-2022 च्या पत्रान्वये कळविले आहे. “Ration Card New GR”.

          मित्रांनो, राज्यातील औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपिएल केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना माहे जानेवारी, 2023 पासून अन्नधान्याऐवजी प्रतिमाह प्रति लाभार्थी 150 रु. इतक्या रोख रकमेच्या थेट हस्तांतरणाची (Direct Benefit Transfer-DBT) योजना कार्यान्वित करण्यास याद्वारे मान्यता देण्यात आली आहे.

          तसेच प्रतिवर्षी किमान आधारभूत किमतीत होणाऱ्या वाढीनुसार केंद्र शासनाने अधिसूचित केलेल्या Cash Transfer of Food Subsidy Rules, 2015 मधील तरतुदीनुसार प्रतिमाह प्रतिलाभार्थी सुधारित वाढीव रोख रक्कम (पुढील दशकाच्या पूर्णांकात थेट हस्तांतरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ‘Ration Card New GR’

          दि. 24-07-2015 च्या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आलेल्या निकषांनुसार शेतकरी योजनेच्या लाभासाठी Ration Card Management System RCMS वर नोंद असलेल्या पात्र शिधापत्रिकाधारकांकडून DBT साठी आवश्यक असलेला बँक खात्याचा तपशिल सोबत जोडलेल्या नमुन्यात ऑफलाईन / ऑनलाईन भरुन घेण्यात येणार आहे. शिधापत्रिकाधारकांनी अर्जासोबत उचित कागदपत्रांची/प्रमाणपत्रांची पूर्तता करणे आवश्यक राहणार आहे. {Ration Card New GR}


या योजने साठी कोण पात्र आहे? कोणत्या जिल्ह्या मध्ये ही योजना राबवीन्यात येणार आहे?:-

          मित्रांनो, राज्यातील औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपिएल केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ भेटणार आहे आणि या जिल्ह्यां मध्ये ही योजना राबविन्यात येणार आहे.

कोणता फॉर्म तुम्हाला कसा भरायचा आहे आणि हा फॉर्म तुम्हाला कुठे जमा करायचा आहे?

          मित्रानो तुम्ही जर या योजनेचा GR डाउनलोड केला असेल तर तुम्हाला या gr च्या सर्वात खाली फॉर्म सुद्धा देण्यात आलेला आहे.
  1. हा फॉर्म फ़क्त कुटुंब प्रमुखानेच भरायचा आहे.
  2. कुटुंब प्रमुखाचे एक बैंक अकाउंट असणे आवश्यक आहे.
  3. बैंक अकाउंट ला आधार नंबर लिंक असणे आवश्यक आहे.
  4. राशन कार्ड ला कुटुंब प्रमुखाचे आधार नंबर लिंक असणे आवश्यक आहे.
  5. या फॉर्म सोबत राशन कार्ड च्या पहिल्या आणि शेवटच्या पानाची ज़ेरॉक्स प्रत जोडायची आहे.
  6. आणि बैंक अकाउंट पासबुक ची पहिल्या पानाची ज़ेरॉक्स प्रत जोडायची आहे.
  7. हा फॉर्म डाउनलोड करा येथे क्लिक करा.
मित्रानो हा फॉर्म व्यवस्थित पूर्ण भरून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या रेशन धान्य दुकानात किंवा तहसील कार्यालयात जमा करायचा आहे. 

👇या १४ जिल्ह्यात आता रेशन धान्याऐवजी रोख पैसे मिळणार, लवकर हा फॉर्म भरून द्या | Ration Card New GR 👇 

📎मित्रानो अश्याच ऑनलाइन सरकारी आणि डिजिटल माहिती साठी फ़ॉलो, सबस्क्राइब, लाइक, शेयर करायला विसरु नका.

📌Marathi Blog:- Abk Online Tips
📌Marathi Instagram Page:- Abk Online Tips
📌Marathi YouTube Channel:-  Abk Online Tips
📌Marathi Shorts YouTube Channel:-  Marathi Digital Tips
📌English Blog:- Digital Tech Akshay