Ticker

6/recent/ticker-posts

PM Kisan Yojana 13 Installment Date - पीएम किसान योजनेचा तेरावा हप्ता या दिवशी जमा होणार

PM Kisan Yojana 13 Instalment Date -

 पीएम किसान योजनेचा तेरावा हप्ता या दिवशी जमा होणार


PM Kisan Yojana 13 Installment Date, पीएम किसान योजनेचा तेरावा हप्ता या दिवशी जमा होणार, pm kisan samman nidhi yojana maharashtra 13 installment

          नमस्कार मित्रानो तुमचे माझ्या Abk Online Tips या मराठी ब्लॉग मध्ये स्वागत आहे. मित्रानो २०२३ या नविन वर्षात सर्व शेतकरी वर्गाला प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेचा १३ वा हफ्ता ची वाट पहावी लागत आहे. मित्रानो या आर्टिकल मध्ये PMKISAN योजनेचा १३ वा हफ्ता केव्हा येणार आहे याची सम्पूर्ण माहिती आहे म्हणून हा लेख सम्पूर्ण नक्की वाचा.


What Is PMKISAN Yojana - पीएम किसान योजना काय आहे?:- 

          पीएम किसान योजना ही एक केंद्रीय योजना आहे, जी देशातील सर्व भूमीधारक शेतकऱ्यांना कृषी आणि संबंधित कामासाठी तसेच घरगुती आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी सहाय्य करते. शेतकर्‍यांना सन्माननीय जीवनासाठी मदत म्हणून ही योजना सुरु झाली. या योजनेच्या लाभार्थ्यांचे संपूर्ण आर्थिक दायित्व केंद्र सरकार उचलते.

          मित्रानो ही योजना देशातील सर्व भूमीधारक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करते. नविन २०२३ या वर्षात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा तेरावा हप्ता आहे. या महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. मात्र या योजनेचा लाभ केवळ आधार संलग्न असलेल्या बँक खातेदारांनाच होणार आहे.

          केंद्र सरकारच्या किसान सन्मान निधी (PM Kisan) अंतर्गत शेतकऱ्यांना एकूण ६००० रुपये वार्षिक मिळतात. केंद्र सरकार ते पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तीन टप्प्यांत वर्ग करणार आहे. म्हणजेच वर्षभरात तीन हप्त्यांमध्ये पैसे पाठवले जातात. शेतकऱ्यांना प्रत्येक हप्त्यात २००० हजार रुपये मिळतात.

          या योजनेअंतर्गत आतापर्यंत १२ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. आता १३ व्या हप्त्याची शेतकरी आतुरतने वाट पाहत आहे. अशातच, १३ वा हप्ता कधी मिळणार याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. केंद्र सरकारकडून १३ व्या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

          PM Kisan Samman Nidhi या योजनेचा तेरावा हप्ता हा 27 फेब्रुवारी 2023 रोजी खात्यात जमा होणार असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप त्यांचे EKYC पूर्ण केले नाही त्यांना तेराव्या हप्त्याची रक्कम मिळणार नाही. पीएम किसानमध्ये नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी EKYC अनिवार्य आहे.

          मित्रानो ज्या शेतकऱ्यांचे ई-केवायसी झालेले नाही, अशा शेतकऱ्यांनी आपल्या बँकेत जाऊन ई केवायसी पूर्ण करुन घ्यावे अथवा त्यासाठी महा ई-सेवा केंद्र चालकांची मदत घ्यावी किंवा त्या शेतकऱ्यांनी बँक खाती इंडियन पोस्ट पेमेंट बँक मध्ये उघडावीत व बँक खात्यामध्ये जमा होईल. 

          मित्रानो आधार सीडिंग प्रलंबित लाभार्थ्यांनी बँकेत जाऊन आधार सीडिंग ई-केवायसी करुन घ्यावे, त्यासाठी महा-ई-सेवा केंद्र चालकांची मदत घ्यावी अथवा बँक खाते आयपीपीबीमध्ये भारतीय डाक विभागामार्फत उघडण्यात यावेत असे पीएम किसान योजनेचे नोडल अधिकारी यांनी सांगितले आहे.


PM Kisan योजनेचे पैसे खात्यात जमा झाले आहेत की नाही हे असे पहा!:-

  • प्रधानमंत्री किशन सन्मान निधीच्या अधिकृत वेबसाइटवर जा - pmkisan.gov.in.

  • वेबसाईटच्या उजव्या बाजूला 'फार्मर्स कॉर्नर' आहे. खाली 'लाभार्थी स्थिती' टॅब आहे. त्यावर क्लिक करा.

  • नंतर 'मोबाइल नंबर' निवडा. 'नोंदणी क्रमांक' वर क्लिक करा. मग काप्त्च्या द्यावा लागेल. त्यानंतर 'डेटा मिळवा' वर क्लिक करा.

  • पंतप्रधान सन्मान निधीचे पैसे तुमच्या खात्यात जमा झाले आहेत की नाही हे तुम्ही पाहू शकाल.


या शेतकऱ्यांना मिळणार नाही PM किसानचा योजनेचा लाभ:-

          मित्रानो पीएम किसान लाभार्थी शेतकऱ्यांना ई केवायसी (e-KYC) करणे बंधनकारक आहेत. अशातच ज्या शेतकऱ्यांनी अद्याप त्यांचे EKYC पूर्ण केले नाही त्यांना तेराव्या हप्त्याची रक्कम मिळणार नाही. OTP आधारित eKYC PM Kisan पोर्टलवर उपलब्ध आहे. बायोमेट्रिक आधारित eKYC साठी जवळच्या CSC केंद्रांशी संपर्क साधता येईल. eKYC ची अंतिम तारीख १० फेब्रुवारी होती.


👇👇Video👇👇



📎मित्रानो अश्याच ऑनलाइन सरकारी आणि डिजिटल माहिती साठी फ़ॉलो, सबस्क्राइब, लाइक, शेयर करायला विसरु नका.

📌Marathi Blog:- Abk Online Tips
📌Marathi Instagram Page:- Abk Online Tips
📌Marathi YouTube Channel:-  Abk Online Tips
📌Marathi Shorts YouTube Channel:-  Marathi Digital Tips
📌English Blog:- Digital Tech Akshay