Ticker

6/recent/ticker-posts

Maharashtra Government Good News On Shiv Jayanti 2023 - Free Toll - शिवनेरी मार्गावरील तीन टोलवर टोलमाफी

Maharashtra Government Good News On Shiv Jayanti 2023 - Free Toll - शिवनेरी मार्गावरील तीन टोलवर टोलमाफी..


shivjayanti-2023-toll-free-from-state-government


          नमस्कार मित्रानो Abk Online Tips या मराठी ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रानो राज्य शासनाकडून शिवजयंती साजरी करण्यासाठी यंदा जोरदार तयारी सुरू आहे. यंदाही शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याने शिवभक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार असल्याची शक्यता असल्यानं सरकारनं हा निर्णय घेतला आहे.

          शिवनेरीवर जाणाऱ्या शिवभक्तांसाठी आता टोल माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मित्रानो ही टोलमाफी शिवनेरी किल्ल्याच्या मार्गावरील असलेल्या तीन टोलवर करण्यात आलेली आहे. ज्यामध्ये खालापूर, तळेगाव, खेड, राजगुरुनगर टोलनाक्यांचा समावेश आहे. तसेच शिवनेरीवर 3 दिवस विविध बचतगटांची उत्पादने आणि खाद्यपदार्थांच्या 300 स्टॉलचे प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले आहे.

          छत्रपती शिवाजी महाराजांची यंदा 393 वी जयंती साजरी होत आहे. त्याचबरोबर यावर्षी  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण होत आहेत.  शिवजयंतीच्या (Shivjayanti) पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं शिवभक्तांनी टोलमाफ करण्याचा निर्णय घेतला आहे. 19 फेब्रुवारीला शिवनेरीवर जाणाऱ्या शिवभक्तांना टोलमाफ करण्यात आला आहे.


 तीन दिवस चालणारे कार्यक्रमाची रूपरेषा पुढीलप्रमाणे:-

👉 18 फेब्रुवारी 2023 :

▪️ सायं. 6.30 वा. हिंदवी स्वराज्य महोत्सव 2023 उदघाटन.

▪️ सायं. 7 ते रात्री 10 वा. सुप्रसिद्ध दिग्दर्शक अशोक हांडे यांचा ‘मराठी बाणा’ कार्यक्रम.


👉 19 फेब्रुवारी 2023:

▪️ स. 9 ते 11 वा. किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा

▪️ दु. 3 ते 5 वा. शिववंदना

▪️ सायं. 6.15 ते 7 वा. महाआरती कार्यक्रम

▪️ सायं. 7 ते रात्री 10 वा. जाणता राजा या महानाट्याचा कार्यक्रम


👉 20 फेब्रुवारी 2023: सायं.7 ते रात्री 10 वा. जाणता राजा कार्यक्रम


📎मित्रानो अश्याच ऑनलाइन सरकारी आणि डिजिटल माहिती साठी फ़ॉलो, सबस्क्राइब, लाइक, शेयर करायला विसरु नका.

📌Marathi Blog:- Abk Online Tips
📌Marathi Instagram Page:- Abk Online Tips
📌Marathi YouTube Channel:-  Abk Online Tips
📌Marathi Shorts YouTube Channel:-  Marathi Digital Tips
📌English Blog:- Digital Tech Akshay